शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीत अपघातात एक ठार

By admin | Updated: July 1, 2015 00:21 IST

सात जखमी : अपघातग्रस्त कर्नाटकातील; दोन कारमध्ये धडक

आंबोली : आंबोली-मुळवंदवाडी येथे ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात युवक जागीच ठार झाला, तर अन्य सातजण गंभीर जखमी झाले. मृत युवकाचे नाव अशोककुमार चंद्रशेखर हिंदमणी (रा. लोकापूर-बागलकोट) असे आहे. सर्व जखमींना उपचारासाठी बेळगाव तसेच सावंतवाडी येथील रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी घडला.आंबोली-मुळवंदवाडी येथे ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात सावंतवाडीकडे येणाऱ्या कारला बेळगावकडे जाणाऱ्या आयकॉन कारची समोरासमोर जोरदार धडक बसली. धडक एवढी जबरदस्त होती की, दोन्ही कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला, तर सात ते आठ युवक बसलेली आयकॉन कार रस्त्यापासून काही अंतरावर फेकली गेली. अपघातानंतर यामधील अशोककुमार चंद्रशेखर हिंदमणी हा आयकॉन कारमधील युवक जागीच ठार झाला, तर शभू बजंत्री (वय ३९), ईश्वर लमाणी (२९), अरुण (पूर्ण नाव समजू शकले नाही. वय २८, सर्व रा. लोकापूर-बागलकोट) या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींच्या डोक्याला तसेच चेहऱ्याला गंभीर इजा झाली आहे. जखमींवर सावंतवाडी कुटीर रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी बेळगाव येथे हलवण्यात आले आहे. तर इंडिका कारमधील महम्मद अलिफ नाईफ (वय २७), महम्मद नाईक (२६), अभिषेक पाटील (२४), प्रसन्ना दर्गागोडा (२७), वैभव मान्नूर (२९), गिरीष हुबळी (३२, सर्व रा. आरपीडी बेळगाव) यांना आंबोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमधील जखमींना बाहेर काढताना पोलिसांची व ग्रामस्थांची चांगलीच दमछाक झाली होती. जखमींना बाहेर काढल्यानंतर बराच वेळ जखमींची ओळख पटत नव्हती. आयकॉन कारमधील जखमींना मराठी येत नसल्याने उशिरापर्यंत त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क होत नव्हता. अखेर सावंतवाडीत या सर्व जखमींना आणल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांना माहिती देण्यात आली. अपघाताचा तपास आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे कॉन्स्टेबल मंगेश शिंगाडे, नीलेश उम्रजकर करीत आहेत. (वार्ताहर)१०८ रुग्णवाहिका तातडीने दाखलअपघाताची माहिती आंबोलीतून १०८ रुग्णवाहिकेला देण्यात आली. मात्र, सावंतवाडीतील रुग्णवाहिका गोवा येथे रुग्ण घेऊन गेल्याने कुडाळ, दोडामार्ग, आजरा तसेच वेंगुर्ले येथील १०८ रुग्णवाहिका आंबोली व सावंतवाडीत तातडीने दाखल झाल्याने जखमींवर तातडीने उपचार करण्यात आले. त्यामुळे जखमींचे प्राणही वाचल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.