जयसिंगपूरच्या एकाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू

By Admin | Updated: October 18, 2015 01:21 IST2015-10-18T00:44:38+5:302015-10-18T01:21:30+5:30

उदगावतील घटना : जाळ्यात पाय अडकला

One of Jaisingpur dies in Krishna river and dies | जयसिंगपूरच्या एकाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू

जयसिंगपूरच्या एकाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू

जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीत पोहताना मच्छिमाराच्या जाळ्यात पाय अडकल्याने दिलीप देवेंद्र चुडाप्पा (वय ५५, रा. १३वी गल्ली, जयसिंगपूर) यांचा बुडून मृत्यू झाला. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, चुडाप्पा हे दररोज सकाळी उदगाव येथील कृष्णा नदीत पोहण्यासाठी जात होते. शनिवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले. पोहत अंकलीच्या पैलतीरी जात असताना मच्छिमाराने मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात त्यांचा पाय अडकला व बुडून त्यांचा मृत्यू झाला.
नदीपात्रात दिलीप चुडाप्पा हे न आढळल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध घेतला. यावेळी मच्छिमाराच्या जाळ्यात चुडाप्पा यांचा मृतदेह आढळला. जयसिंगपूरचे नगरसेवक चंद्रकांत खामकर यांच्यासह सहकाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला. नितीन चुडाप्पा यांनी जयसिंगपूर पोलिसांना घटनेची वर्दी दिली. प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिलीप चुडाप्पा हे आरटीओ एजंट म्हणून काम करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: One of Jaisingpur dies in Krishna river and dies