कोगेत अपघातात एकजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:25 IST2021-04-10T04:25:02+5:302021-04-10T04:25:02+5:30

कोल्हापूर : कोगे (ता. करवीर) येथे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने दुचाकी चालवून एकाला जखमी केल्याप्रकरणी संशयित महेश मारुती ...

One injured in Koge accident | कोगेत अपघातात एकजण जखमी

कोगेत अपघातात एकजण जखमी

कोल्हापूर : कोगे (ता. करवीर) येथे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने दुचाकी चालवून एकाला जखमी केल्याप्रकरणी संशयित महेश मारुती पाटील (रा. कुडित्रे, ता. करवीर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद मलिकार्जुन लक्ष्मण विभुते (वय ३८, रा. कोगे, ता. करवीर, मूळ रा. टाकळी सिंकदर, ता. मोहळ, जिल्हा सोलापूर) यांनी दिली. संशयित पाटील हा आपल्याकडील दुचाकीवरून शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता फिर्यादीचा मुलगा विजय याला मागे बसवून कोगे गावातील वेशीजवळील चौकातून जात होता. यावेळी त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपघात झाला. या अपघातात विजय याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात संशयित महेश याच्यावर गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस नाईक रामदास बांगर करत आहेत.

Web Title: One injured in Koge accident