शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फये प्रकल्पाला एक कोटी नव्वद लाखांचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:28 IST

गारगोटी : भुदरगड तालुक्यातील फये लघु पाटबंधारे प्रकल्पाचे काम २००४ मध्ये पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे फये, हेदवडे, कोळवण, ...

गारगोटी : भुदरगड तालुक्यातील फये लघु पाटबंधारे प्रकल्पाचे काम २००४ मध्ये पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे फये, हेदवडे, कोळवण, नवरसवाडी यासोबतच अनेक वाड्या व वस्त्यांना शेतीसाठी व पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे. यामुळे हा भाग हिरवागार होण्यास मदत होते. परंतु अलीकडच्या काळात प्रकल्पाच्या बंधाऱ्यातून व व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्रकल्पास धोका निर्माण होऊ शकतो. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून या बंधाऱ्याच्या दुरूस्तीकरिता १ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. गळती काढण्यासाठी प्रकल्पातील पाणी सोडावे लागणार आहे. यामुळे शेतीचे व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसमवेत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, प्रकल्पाला गळती असल्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नाही. त्यामुळे एकूण पाणी साठ्याच्या ६५ टक्के पाणी शेतकऱ्यांना व नागरिकांना वापरता येते. त्यामुळे प्रकल्पाची दुरूस्ती आवश्यक आहे. या गळतीमुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी हे काम करणे अत्यंत आवश्यक आहे. दुरुस्तीनंतर प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणी साठल्यास शेतीसाठी व पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे यावर्षी शेतीचे नुकसान होणार असले, तरी प्रकल्पाच्या सुरक्षिततेसाठी हे काम करणे गरजेचे आहे. यासाठी भागातील शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

यावेळी कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी प्रकल्पाच्या सर्व तांत्रिक बाबी शेतकऱ्यांना सांगून लवकरात-लवकर दर्जेदार काम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी दामोदर पाटील, अनंत डोंगरकर, दिनकर देसाई यांनी मनोगते व्यक्त केले. बाजार समितीचे संचालक कल्याणराव निकम, सभापती आक्काताई नलवडे, शाखा अभियंता संभाजी भोपळे, कोळवण सरपंच दिनकर गुरव, हेदवडे सरपचं पांडुरंग देसाई, दिनकर देसाई, आर. के. पाटील, शंकर देसाई, धनाजी गुरव, प्रकाश कडव, दामाजी पाटील, अरविंद गुरव, महिपती पाटील, संजय पाटील, अविनाश देसाई, सुनील देसाई, तानाजी पांगम, रवी फुटाणे, विष्णुपंत केसरकर उपस्थित होते.