शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोविड लसीकरणात नृसिंहवाडी आरोग्य केंद्र पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST

रमेश सुतार बुबनाळ : औरवाडसह नदीपलीकडील सात गावांसाठी वरदान ठरलेल्या नृसिंहवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत कोविड लसीकरण सुरू झाले ...

रमेश सुतार

बुबनाळ : औरवाडसह नदीपलीकडील सात गावांसाठी वरदान ठरलेल्या नृसिंहवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत कोविड लसीकरण सुरू झाले आहे. आतापर्यंत या केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात ४५ वयोगटावरील १० हजार २२८ जण नागरिक असून, यापैकी ५११२ जणांनी लस घेतली आहे. त्यामुळे ५० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र लसीकरणात पास झाले आहे.

शासनाकडून लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर सुरू असून, ४५ वयोगटावरील नागरिकांना कोरोना लस घेण्यासाठी शासनाने आदेश दिले आहेत. यानुसार नृसिंहवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ८ मार्चपासून लसीकरणास सुरुवात झाली आहे. या केंद्रांतर्गत औरवाड, गणेशवाडी, कवठेगुलंद, आलास आदी उपकेंद्रांत लसीकरण सुरू आहे.

नृसिंहवाडी ९३ टक्के, औरवाड ४२ टक्के, बुबनाळ १९ टक्के, आलास ४७ टक्के, कवठेगुलंद ६० टक्के, गौरवाड ३४ टक्के, शेडशाळ २६ टक्के, गणेशवाडी २७ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे कोरोना लसीकरणात नृसिंहवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र पास झाले आहे. यासाठी केंद्राचे प्रमुख डॉ. पी. एस. पाखरे, डॉ. क्षितिजा पाटील, डॉ. राहुल वायदंडे, डॉ. प्रियांका दक्षवंत, डॉ. प्राजक्ता गुरव, डॉ. स्वाती कांबळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ भीम बोरगावे, आरोग्य सहायक एन. वाय. कांबळे, एस. एस. चव्हाण, शिवमूर्ती बदामे, व्ही. पी. शेजाळ, एस. जी. खोत यांच्यासह आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

कोट - कोविड लसीबाबत अफवांवर विश्वास न ठेवता ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी कोविड लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी. लस घेतल्याने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

- डॉ. पी. एस. पाखरे, केंद्रप्रमुख नृसिंहवाडी

फोटो - १२०४२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण युद्धपातळीवर सुरू आहे.