आता चारा विकण्यासाठी सोशल मीडियाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:23 IST2021-02-10T04:23:27+5:302021-02-10T04:23:27+5:30

हलकर्णी : मानवाने काळानुसार बदलले पाहिजे, असा मतप्रवाह आता समाजात रूढ आहे, ते खरेही ठरत आहे. ग्रामीण भागातही आता ...

Now use social media to sell fodder | आता चारा विकण्यासाठी सोशल मीडियाचा वापर

आता चारा विकण्यासाठी सोशल मीडियाचा वापर

हलकर्णी :

मानवाने काळानुसार बदलले पाहिजे, असा मतप्रवाह आता समाजात रूढ आहे, ते खरेही ठरत आहे. ग्रामीण भागातही आता मोबाइल व त्यावरील सोशल मीडियाचा भरपूर वापर होत आहे. गरज ओळखून अनेक कंपन्यांनी त्यानुसार अ‍ॅपही तयार केले आहेत.

घर, वाहने, दागदागिने, खुली जागा, शेती आदी विकण्यासाठी या सोशल मीडियाचा वापर करण्यात येत होता. मात्र, हल्ली गेला महिनाभर ‘हिरवा मक्या'चा चाराही विकण्याच्या जाहिराती व्हॉट्‌सअ‍ॅप व फेसबुकवर चाऱ्याच्या फोटोसह ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. वाढलेल्या दूध दरामुळे सध्या तर या व्यवसायाला पोषक असे वातावरण आहे. या व्यवसायात पारंगत असलेल्या दूग्ध उत्पादकांनी हा व्यवसाय वाढविण्यासाठी कंबर कसली आहे. यामुळे आता एका जागी दोन किंवा दोनच्या जागी चार जनावरे बाळगण्याचे धाडस ते करत आहेत.

सध्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. याचा नेमका धागा पकडून हलकर्णी व भागातील अल्प भूधारक डोंगराळ, खडकाळ भागातील शेतकरी वर्गाने आपल्या शेतात चाऱ्याच्या मक्याची लागवड केली आहे. काहींनी तर जवळच्या शेतकरीचे पाणी चौथाईने घेऊन हे चाऱ्याचे पीक लक्षवेधी असे केले आहे. याला चांगला दर मिळावा म्हणून त्याचा सोशल मीडियावर प्रचारही सुरू केला आहे. नोव्हेंबर-डिसेंबरसह जानेवारी महिन्यात पाऊस पडल्याने यावेळी गवताची थोडीफार वानवा आहे. साधारण गुंठ्यास एक हजार असा दर सांगण्यात येत असून, तजवीज करून हा चारा विकण्यात येत आहे. हिरवा मका हा दुभत्या जनावरांसाठी उपयोगी असल्याने त्याचे व्यवहार पूर्णत्वास जात आहे.

अल्प अन्नधान्य किंवा काही न पिकणाऱ्या शेतकरी वर्गाला हा मोठा आधार ठरत आहे. दुसऱ्या बाजूला शेतकरी दूध उत्पादकांची चाऱ्याची अडचण भागत आहे. ---------------------------

* फोटो ओळी : विकायचे असलेल्या मका चाऱ्याचा शेती प्लॉट.

क्रमांक : ०९०२२०२१-गड-०१

Web Title: Now use social media to sell fodder