शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नहीं... कुछ करोना - भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:27 IST

स्वप्नं कधी वास्तवात येत असतात का? शेवटी स्वप्नंच ती! माणसाला दिसणारी स्वप्नं ही धुरकट असतात. हीच स्वप्नं काहींच्या आयुष्यात ...

स्वप्नं कधी वास्तवात येत असतात का? शेवटी स्वप्नंच ती! माणसाला दिसणारी स्वप्नं ही धुरकट असतात. हीच स्वप्नं काहींच्या आयुष्यात भरभरून आनंदाचे क्षण देतात, तर काहींना दु:खाशिवाय काहीच देत नाहीत. तरीही माणसं, स्वप्नं बघायचं सोडत नाहीत. मीदेखील 'भ्रमात' होतो की, माझी स्वप्नं ही केव्हातरी नक्की पूर्ण होतील !

मला लहानपणापासून आपणही कोणावर तरी प्रेम करावं असं वाटायचं; पण प्रेमाचा अनुभव शून्यच आहे माझा. तसं बघायला गेलं तर मी आजवर पाच-सहा मुलींवर जीव ओवाळून टाकण्याइतपत प्रेम केलंय... पण इतकं त्यांच्यावर प्रेम करूनही ते सर्व एकतर्फी होतं. माझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती, मला अजून तरी भेटली नाही. प्रेम करायचं म्हणजे, गणिताचा पेपर सोडविण्याइतकं कठीण आहे, माझ्यासाठी...

पण अलीकडे माझा, प्रत्येक दिवस, 'तिच्या' साक्षीने उगवतो...

दररोज रात्री मी तिच्या आठवणीने, व्याकुळ होतो...

तिचं ते खळखळून हसणं, स्वच्छ मराठी बोलणं मला फार

आवडलं...

तिचे घाऱ्या रंगाचे डोळे, गोरापान गोंडस चेहरा, पारिजातकाच्या फुलासारखी तिची नाजूक काया, मी तर तिला पाहताक्षणीच तिच्या प्रेमात पडलो...

मागील वर्षीच्या कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी, दुर्दैवाने माझ्याकडील बी.पी.च्या गोळ्या अचानक संपल्या. त्या गोळ्या खरेदी करण्यासाठी, मी कागल येथील मेडिकल दुकानात गेलो. पण सर्वच मेडिकल दुकानातील विक्रेते मला म्हणाले, ‘तुमच्या गोळ्या इथं मिळणार नाहीत.’ मी त्यांना विचारलं, ‘तुम्ही माझ्या गोळ्या मला कोल्हापूरहन आणून द्याल का?’ ते म्हणाले, ‘कोणत्याही पेशंटच वैयक्तिक औषध, आम्ही आणून देत नाही.’ त्यावेळी कोरोनाची पहिली लाट असली तरी मी आणि माझी पत्नी जीव मुठीत धरून, बी.पी.च्या गोळ्या आणण्यासाठी, कोल्हापूरला गेलो.

त्यानंतर सुमारे एका वर्षाने दुसऱ्या कोरोनाची 'लाट' नुकतीच सुरू झाली; पण अद्याप लॉकडाऊन लागलेलं नव्हतं.

मी माझ्या सासूबाईंना एक मोगऱ्याचं रोप भेट देण्याचं ठरवलं. येथीलच 'अक्षय नर्सरी’मधून ते मी खरेदी केले. ते रोप त्यांना भेट देण्यासाठी मी सासुरवाडीला घेऊन गेलो; पण त्यांच्या घरात प्रवेश केल्या-केल्या मला सासूबाईंनी शिव्यांची लाखाेली वाहिली. त्या म्हणाल्या, ‘कोरोनाची दुसरी लाट सुरू झालीय, तुम्ही आज यायला नको होतं.’ मी म्हणालो, ‘तुमच्या मुलीनंच, ते रोप मला देऊन यायला सांगितलं.’ माझी चूक मी माझ्या पत्नीवर ढकलली. मी त्यांना म्हणालो, ‘कोरोनाची दुसरी लाट अजून सुरू झालेली नाही. कोरोनाच्या साथीपेक्षा अफवांची साथ सर्वत्र पसरलीय.’

थोड्या वेळानंतर मी सासूबाईंना म्हणालो, ‘आता मला छानपैकी 'काढा' करून द्या. आमच्या पत्नी डॉक्टर शुभांगीनं मला सांगितलंय की, 'काढा' प्याल्यानंतर, 'कोरोना' होत नाही.’

माझी पत्नी शुभांगी डी.एच.एम.एस, आहे. त्यामुळं मी मुद्दाम तिचं नाव सांगितलं. त्यामुळं सासूबाई जरा नरम झाल्या. त्या लागलीच आपल्या मुलीची बाजू घेत म्हणाल्या, ‘आमच्या शुभागीनं सांगितलंय, म्हणजे ते खरंच असणार !’ मी बोलताना, त्यांच्या मुलीचं नाव घेतल्यामुळ, 'त्या' काढ्याचा तो 'रामबाण' उपाय, माझ्या चांगलाच उपयोगी पडला.

तरीही, सासूबाईंनी पुन्हा थोड्या वेळाने कोरोनाचा मूड पकडलाच. त्या मला म्हणाल्या, ‘तुम्ही आज, आमच्या घरी ‘क्वारंटाईन' होऊ नका म्हणजे झालं!’ त्यांना असं म्हणायचं होतं की, त्यांच्या घरी, त्या दिवशी मी मुक्काम करू नये !

नाहीतरी, त्या दिवशी मी त्यांच्या घरी राहणारच नव्हतो; कारण मला त्या 'मुसलमान मुलीची प्रकर्षाने आठवण येत होती. तिचा ' विरह' मला सहन होत नव्हता; पण मी माझ्या सासूबाईंना म्हणालो की, ‘मला माझ्या पत्नीशिवाय करमत नाही.’ त्यांना मी शुद्ध लोणकढी थाप मारली.

काही वेळानंतर माझे सासरे म्हणाले, ‘जावईबापूंना 'काढा' देण्यापेक्षा, त्यांना घराबाहेर काढलं पाहिजे.’ त्यांच्या विनोदावर, तेच बराच वेळ हसत होते. 'कोरोना’काळात झालेल्या त्या अपमानामुळे, मला 'रोना' आला.

मी भोजन झाल्यानंतर, त्यांचा निरोप घेतला. त्यानंतर कागलला जाणारी गाडी पकडली. त्यानंतर दुसऱ्या कोरोना लाटेच्या वेळी एक चमत्कार झाला. आमच्या घरापासून अगदी जवळच एक मेडिकलचं दुकान नुकतंच सुरू झालं. डी. फार्म. झालेल्या एका मुसलमान मुलीनं ते दुकान सुरू केलं. सुदैवाने एके दिवशी मी काही औषधे आणण्यासाठी तिच्या दुकानात गेलो. ती दुकानामध्ये काऊंटरजवळच बसली होती. माझ्याबरोबर बोलता-बोलता ती म्हणाली, ‘तुम्हाला पाहिजे असलेलं औषध आमच्याकडे अव्हेलेबल नसेल तर आम्ही 'ते' औषध कोल्हापूरहून आणून देऊ. फक्त तुम्हाला दोन दिवस अगोदर ऑर्डर द्यावी लागेल, इतकंच.’ तिच्या गळ्यात तिने काळ्या दोऱ्यात गुंफलेला ' तावीज ' (ताईत) बांधला होता; पण कालांतराने तीच माझ्या 'गळ्यातील ताईत' बनेल, असं मला वाटलं नव्हतं.

असाच एके दिवशी मी माझी औषधे आणण्यासाठी तिच्याकडे गेलो; पण त्या दिवशी तिला काय झाल होतं कोणास ठाऊक! ती रागातच मला म्हणाली, ‘तुझी औषधं आणलीत, घेऊन जा ती!’ अचानक ' एकेरी' संबोधून मला म्हणाली, ‘पोलिसांना बोलवू काय? आमच्या आई-वडिलांना सांगू काय?’

मी तिला विचारलं, ‘मी काय केलंय, ते तरी सांग!’

ती म्हणाली, ‘ते तुलाच माहिती आहे!’

खरं म्हणजे तिच्याशी काही वावगं वागल्याचं मला तरी आठवत नव्हतं. तिनं केलेल्या त्या आरोपामुळं मला अत्यंत वाईट वाटलं. त्यामुळं काही दिवस आमच्या दोघांच्यातलं सोशल डिस्टन्सिंग वाढलं. त्या घटनेनंतरही मी तिच्याशी पुन्हा 'सलगी' वाढवायचा प्रयत्न केला.