शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सबसिडी नको, धान्यच मिळाले पाहिजे

By admin | Updated: February 25, 2015 00:03 IST

कोल्हापुरात विराट मोर्चा : सर्वसामान्य महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर ; यापुढच्या काळात व्यापक लढ्याचा इशारा

कोल्हापूर : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रोख सबसिडी नको तर अन्न सुरक्षा कायद्यानुसार सर्वांना पुरेसे धान्य मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी मंगळवारी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. येथील रेशन बचाव समितीने आयोजित केलेल्या मोर्चात सुमारे दहा हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते, महिलांचा मोठ्या संख्येने समावेश होता. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या अलीकडील काळात निघालेला हा सर्वांत मोठा मोर्चा होता. मिरजकर तिकटी येऊन दुपारी साडेबारा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, महानगरपालिका, आईसाहेब महाराज पुतळा, लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉनर्रमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. भरउन्हात मोर्चा निघूनही मोर्चेकऱ्यांचा उत्साह कमालीचा होता. कोल्हापूर, इचलकरंजी शहरांसह जिल्ह्णातील ४०० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील महिला-पुरुष मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्चासमोर भाषणात वक्त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर सडकून टीका केलीच, शिवाय जनतेचा हा धान्य मागणीसाठीचा लढा यापुढच्या काळातही व्यापक प्रमाणात आंदोलन करून लढू, असा गंभीर इशारा दिला. रेशन बचाव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी जनतेची कदर न करणारे हे सरकार असल्याचा आरोप केला. जर छत्तीसगड, बंगाल, त्रिपुरा, कर्नाटक, मिझोराम यासह अनेक राज्यांत जर रेशन धान्य दुकानांतून विविध प्रकारचे धान्य दिले जात असेल तर मग महाराष्ट्रात का नाही, असा सवाल करत केंद्रात व राज्यात सत्तांतर झाले आणि पहिला फटका सर्वसामान्यांना बसला. अनेक जिल्ह्यात धान्य पोहोचले नाही. चार महिन्यांपासून केशरी कार्डधारकांनाही धान्य मिळालेले नाही. ‘अच्छे दिन येणार’ असल्याचे सांगून सत्तेवर आलेल्यांनी आता सर्वसामान्य जनतेचा धोक्याचा इशारा समजावा, असे यादव म्हणाले.विद्यमान सरकार हे गरीब जनतेच्या जिवाशी खेळत असल्याचा घणाघात राज्य संघटनेचे अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी केला. जोपर्यंत अंत्योदय योजनेद्वारे ३५ किलो धान्य, एपीएल कार्डधारकांना माणसी १० किलो धान्य मिळत नाही आणि रॉकेल कोटा वाढवून मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला. आॅल इंडिया संघटनेचे अध्यक्ष काका देशमुख यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. ज्यांना कुटुंबच नाही त्या पंतप्रधानांना कुटुंबाची व्याख्या आणि समस्या काय माहीत, असा सवाल यावेळी काका देशमुख यांनी केला. गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्यांसह सर्वांना माणसी चार लिटर रॉकेल दिले पाहिजे, अशी मागणीही केली. या मोर्चात रवींद्र मोरे, शौकत महालकरी, नामदेव गावडे, सतीश कांबळे, नगरसेवक राजू पसारे, संगीता देवेकर, सविता संकपाळ आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)