शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणाने एकाही बालकाचा मृत्यू होऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:53 IST

कोल्हापूर : एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या पोषण अभियानांतर्गत बुधवारी ‘राष्ट्रीय पोषण महिन्याचा’ शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. ...

कोल्हापूर : एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या पोषण अभियानांतर्गत बुधवारी ‘राष्ट्रीय पोषण महिन्याचा’ शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी कुपोषणाने एकाही बालकाचा मृत्यू होऊ नये याची काळजी घ्या, अशा सूचना केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास प्रांताधिकारी वैभव नावडकर, जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे तसेच प्रकल्प अधिकारी, जिल्हा पोषण समन्वयक उपस्थित होते.

यानंतर झालेल्या आढावा बैठकीत अपर जिल्हाधिकारी पवार म्हणाले, अंगणवाडीसेविका, मदतनीस, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता यांचे प्राधान्याने लसीकरण पूर्ण करावे. बालकांना पुरेसा, दर्जेदार आहार नियमित मिळावा याची काळजी घ्या, सर्व बालकांची मोफत आरोग्य तपासणी करून यातील तीव्र आणि मध्यम कुपोषित, दुर्धर, दीर्घकाळ आजारी बालके शोधून त्यांच्यासाठी योग्य संदर्भसेवा व उपचार तसेच घरीच दर दोन तासांनी पौष्टिक आहार देऊन पोषण श्रेणीची देखरेख करा. या महिन्यात संबंधित विभागांनी समन्वयाने उपक्रम राबवून डॅशबोर्डवर नोंदी घ्याव्यात.

शिल्पा पाटील म्हणाल्या, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व गर्भवती स्त्रियांसाठी प्रत्येक सोमवारी ४ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात स्पॉट रजिस्ट्रेशन करून लसीकरण करण्यात येत आहे. स्तनदा मातांसाठीही लसीकरण सुविधा देण्यात येत असून, या महिन्यात १०० टक्के गर्भवती स्त्रिया आणि स्तनदा मातांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील यांनी आभार मानले.

----

तरंग सुपोषित महाराष्ट्राचा

पोषण जनजागृतीसाठी महिला व बालविकास विभागामार्फत ८०८०८०९०६३ हा क्रमांक जाहीर करण्यात आला असून, तो डायल केल्यास व्हॉटसॲपवर विविध पोषण, आरोग्य व आहार, कोविड उपाययोजना याची यादी पाठवली जाते. यात अपेक्षित विषय क्रमांक टाकल्यास विषयाची सर्व सखोल माहिती आणि व्हिडिओ पाठवले जातात. यातील माहिती व पौष्टिक पाककृती व्हिडिओ अद्ययावत होते. अधिकाधिक लोकांनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी व्यापक प्रचार करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी दिल्या.

---

फोटो नं ०१०९२०२१-कोल-पोषण महिना

ओळ : पोषण अभियानांतर्गत बुधवारी ‘राष्ट्रीय पोषण महिन्याचा’ शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

---