वाघवेत नऊ माजी सरपंच, उपसरपंचांचा सुपडासाफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:21 IST2021-01-21T04:21:19+5:302021-01-21T04:21:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील बारा वाड्या-वस्त्यांच्या वाघवे ग्रुप ग्रामपंचायतीत मतदारांनी जुन्यांचा सुपडासाफ करून ...

Nine former sarpanches and deputy sarpanches in Waghave | वाघवेत नऊ माजी सरपंच, उपसरपंचांचा सुपडासाफ

वाघवेत नऊ माजी सरपंच, उपसरपंचांचा सुपडासाफ

लोकमत न्यूज नेटवर्क

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील बारा वाड्या-वस्त्यांच्या वाघवे ग्रुप ग्रामपंचायतीत मतदारांनी जुन्यांचा सुपडासाफ करून नव्या दमाच्या युवकांना प्राधान्य दिले आहे. यात नऊ माजी सरपंच, उपसरपंचांचा समावेश आहे. अचुक पॅनल निवडून सत्ता प्रस्तापित केलेले गटप्रमुख लक्ष्मण मुढेकर यांचा नेम चुकला.

१२ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात होते. दाजी पाटील, पोपट पाटील यांची जय हनुमान आघाडी, लक्ष्मण मुढेकरांची हनुमान शेतकरी आघाडी आणि दत्तात्रय पाटील, संजय सुतार यांची मरगाईदेवी विकास आघाडी अशी तीन पॅनल रिंगणात होती.

सरपंच, उपसरपंच पदावर काम केलेले सहा, तर तीन उमेदवार पद सांभाळलेल्यांच्या घरातीलच होते. गावकारभारी पद असताना गावचा विकास काय झाला आणि आता काय होणार हे ओळखून मतदारांनी निवडणुकीत त्यांना खड्यासारखे बाजूला करत घराणेशाहीला धडा शिकवला.

लक्ष्मण मुंढेकर गटाचे प्रदीप पाटील, विद्या विभुते, जिजाबाई शेलार, राजश्री उदाळे, दिनकर साठे, प्रकाश कुऱ्हाडे, संपदा माने तर जय हनुमान गटाचे आरती पाटील, अश्विनी केर्लेकर, सारिका पाटील, मरगाईदेवी विकास गटाचे श्यामराव उदाळे, अर्जुन कदम हे विजयी झाले.

यांचा झाला पराभव

सरपंचपद सांभाळलेले बाजार समितीचे माजी संचालक लक्ष्मण मुढेकर, संजय सुतार, एस.के. जाधव, बळीराम उदाळे, जयश्री साठे यांचा पराभव झाला. माजी सरपंच चंद्रकांत विभुते यांच्या पत्नी निता विभुते, सुनीता चौगुले यांचे पती अर्पण चौगुले, बाजीराव उदाळे यांच्या पत्नी योगीता उदाळे, तर उपसरपंच एम.डी. कांबळे यांचा पराभव झाला.

Web Title: Nine former sarpanches and deputy sarpanches in Waghave