सोमवारपासून दुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:23 IST2021-02-10T04:23:14+5:302021-02-10T04:23:14+5:30

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे देण्यात येणारी खासगी दुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका सोमवार(दि.१५)पासून (एम.एच.०९ एफटी) या नावाने सुरू ...

New registration series of two-wheelers from Monday | सोमवारपासून दुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका

सोमवारपासून दुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे देण्यात येणारी खासगी दुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका सोमवार(दि.१५)पासून (एम.एच.०९ एफटी) या नावाने सुरू होत आहे. जुनी नोंदणी मालिका (एमएच ०९ एफएस) ही मालिका शुक्रवारपर्यंत संपत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज सोमवारपर्यंत सकाळी पावणे दहा ते दुपारी दोन स्वीकारण्यात येतील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी सांगितले.

लिलाव पद्धतीव्दारे वाहन नोंदणी क्रमांकाची मागणी करतेवेळी पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मूळ रकमेचा डीडी जोडणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पे ऑर्डर अर्जासोबत देऊ नये. धनाकर्ष काढताना SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRAS या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला डीडी स्वीकारला जाणार नाही. पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचा एकच डीडी दि. 15 फेब्रुवारीला सकाळी ९.४५ ते २ या वेळेत आणून द्यावा. धनाकर्ष शक्यतो STATE BANK OF INDIA (SBI) या बँकेचाच असावा. डीडीच्या मागे अर्जदाराचे नाव, मोटार वाहनाचा प्रकार, मोबाईल क्रमांक व मागणी केलेली मालिका पसंती क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.

एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्या क्रमांकाचा दुसऱ्या दिवशी लिलाव करण्यात येईल. त्यासाठी अर्जदारांकडून मंगळवारी (दि.१६) जादा रकमेचा स्वतंत्र डीडी बंद लिफाप्यात नियोजित वेळेत जमा करणे बंधनकारक राहील. एक पेक्षा जास्त अर्ज असलेल्या क्रमांकाचा लिलाव मंगळवारी दुपारी ४ वाजता कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

Web Title: New registration series of two-wheelers from Monday