शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

वाटाघाटीत अडकल्या नव्या बसेस

By admin | Updated: August 2, 2014 00:21 IST

फेरनिविदा काढणार : अशोक लेलॅँड कंपनीला ठेका देण्याचा निर्णय रद्दबातल

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या विशेष अनुदानातून महानगरपालिका परिवहन विभाग (के.एम.टी.) नव्या १०४ बसेस खरेदी करणार आहे. बस खरेदीसाठी काढलेल्या दुसऱ्यांदा निविदेत टाटा मोटर्स (२४.७२लाख), अशोक लेलँड (२४.६३ लाख) व व्ही. व्ही. मर्शियल व्हेईकल्स् (२५.२२लाख) (कंसातील दर प्रतिबस याप्रमाणे) बसेस पुरवठा करण्यास इच्छुक आहेत. सर्वांत कमी निविदा दर आलेल्या अशोक लेलँड कंपनीला ठेका देण्याचा निर्णय रद्दबातल ठरविण्यात आला. आज, शुक्रवारी परिवहन समितीच्या बैठकीत नव्याने निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘अर्थ’पूर्ण वाटाघाटी करण्यासाठी अशोक लेलँडकडून प्रतिसाद न मिळाल्याने नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याची चर्चा आहे. केंद्र सरकारने के.एम.टी.ला १०४ नव्या बसेस घेण्यासाठी ४४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. महासभेने नव्या बसेसचा करासाठी साडेचार कोटी रुपयांची उभारणी करण्यास मंजुरी दिली आहे. नव्या बसेस आल्यानंतर के.एम.टी.ला पूर्ण क्षमतेने सेवा देणे सोपे होणार आहे. गेली दोन महिने भाडेतत्त्वावरील ३० बसेस बंद झाल्याने अनेक मार्गावरील सेवा बंद करण्याची वेळ के.एम.टी.वर आली आहे. कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिल्याखेरीज पगार होत नाही अशी अवस्था आहे. दररोज किमान दोन ते अडीच लाखांचा तोटा घेऊन प्रवास करणाऱ्या के.एम.टी.ला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी प्रशासकीय व राजकीय पातळीवर कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत.के.एम.टी.ने दुसऱ्यांदा काढलेल्या निविदेत तीन कंपन्या तांत्रिक निकषांवर पात्र ठरल्या. त्यामध्ये सर्वांत कमी दराची निविदा आलेल्या अशोक लेलँड कंपनीला निविदा मंजुरीचे पत्र देण्याबाबत बैठक लांबणीवर पडत होती. शेवटी निविदा नामंजूर करण्यात आली. केंद्र सरकारच्या निकषांप्रमाणे वरील चार कंपन्याच पुन्हा पात्र ठरणार आहेत तरीही पुन:पुन्हा निविदेच्या त्रांगड्यात नव्या बसेस अडवून ठेवण्यात येत आहेत. ‘ढपला संस्कृती’ला लगाम घालण्यासाठी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी लक्ष घालण्याची मागणी के.एम.टी.च्या कर्मचाऱ्यांतून होत आहे. (प्रतिनिधी) नव्या बसेसमधून कशाप्रकारे हात ओले करता येतील याकडे व्यवस्थापनासह कारभाऱ्यांचे लक्ष आहे. गेली पंधरा दिवस निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही ठेकेदारास वर्क आॅर्डर देण्यास विलंब झाला. के.एम.टी.चे कितीही नुकसान झाले तरी चालेल; पण हिस्सा मिळालाच पाहिजे, अशीच व्यवस्थापन व समितीची भूमिका असल्यानेच दररोज एका ठेकेदारास आवतन दिले जाणार आहे.