शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय समित्यांवर लवकरच नव्या नियुक्त्या

By admin | Updated: January 25, 2015 01:07 IST

पालकमंत्र्यांची ग्वाही : वॉकिंग प्लाझा करण्याची मागणी

कोल्हापूर : विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांसह विविध शासकीय समित्यांवरील नियुक्त्या करण्याची प्रक्रिया येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही सहकार व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काल, शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली. विविध समित्यांवर सुमारे हजारांहून अधिक सदस्यांची नियुक्ती करावी लागते, तिथे कार्यकर्त्यांना संधी देता येते म्हणून ते तातडीने केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी सभेत ही मागणी केली. चंदगडला महिन्यातून दोन वेळा वाहन परवाना शिबिर घ्यावे, अशीही मागणी आमदार कुपेकर यांनी केली. सभेत आमदार राजेश क्षीरसागर यांनी जयंती नाला ते कसबा बावडा असा सुमारे तीन किलोमीटरचा नदीकाठाने वॉकिंग प्लाझा करण्यात यावा, अशी मागणी केली. नदीपात्रापासून विशिष्ट अंतरापर्यंत बांधकाम परवाना द्यायचा नाही, असे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे त्यासंबंधी अधिक माहिती घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. सगळ्यांनाच बोलण्याची संधी दिल्याबद्दल राष्ट्रवादीचे सदस्य अरुण इंगवले यांनी पालकमंत्र्यांचे जाहीर अभिनंदन केले. पालकमंत्र्यांचे अभिनंदन केल्यावर आमदार चंद्रदीप नरके यांनी इंगवले यांना चेष्टेने ‘आता तुमचे काम सांगा..’ असा चिमटा काढला. ‘तुम्ही जरा थांबा आता... आमचे आम्ही बघतो...’ असेही आमदार नरके यांनी इंगवले यांना सुनावले. आमदार नरके यांनी लोकप्रतिनिधींनी मागितलेला निधी व सरकारकडून प्रत्यक्षात मिळणारा निधी यांमध्ये मोठी तफावत असते; त्यामुळे आराखडा करताना नेमकेपणाने करावा. एखाद्या गावातील काम सुचविले आणि निधी नाही मंजूर झाला तर लोक नाराज होतात. त्यामुळे सुचविलेल्या कामांना निधी कसा उपलब्ध होईल असे प्रयत्न प्रशासनाने कसोशीने केले पाहिजेत, असा आग्रह धरला. टोल, ऊसदर प्रश्नास बगल या बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये त्यांनी समितीच्या बैठकीतील निर्णयांची जुजबी माहिती दिली; परंतु बैठकीतील निर्णयाव्यतिरिक्त अन्य कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले. वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींशीही बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. सुरुवातीलाच त्यांनी टोल, मंत्रिमंडळाचा शपथविधी, ऊसदर यांविषयी आपण काहीच बोलणार नाही, असे स्पष्ट केले. टोल, ऊसदर यांविषयी या सरकारकडे आता सांगण्यासारखे ठोस काहीच नसल्याने त्यांनी या प्रश्नास सोयीस्कर बगल देणेच पसंत केले.(प्रतिनिधी)