शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नव्या-जुन्यांमध्येच ‘सिद्धार्थनगर’ची लढत

By admin | Updated: August 25, 2015 23:59 IST

एकगठ्ठा मतदान निर्णायक : तेजस्विनी घोरपडे यांच्यासह भांदिगरे, पिरजादे, पटकारे, खोडवे, आदी रिंगणात--सिद्धार्थनगर

सचिन भोसले - कोल्हापूर  सिद्धार्थनगर या प्रभागात नव्या प्रभाग रचनेत घुणकीकर पॅसेज, पुरेकर गल्ली, शिंदे गल्ली, बुधवार पेठ, नरसोबा गल्ली, ब्रह्मपुरी, दर्गा, तोरस्कर चौक, ख्रिश्चन वसाहत या भागांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. मात्र, या प्रभागाचा चेहरा असणारा खरा भाग सिद्धार्थनगरच आहे. सिद्धार्थनगरचे एकगठ्ठा मतदानच निर्णायक ठरणार आहे. या भागाचे नेतृत्व करण्यासाठी माजी नगरसेविका तेजस्विनी घोरपडे, अफजल पिरजादे, सुशील भांदिगरे, जय पटकारे, अरुण खोडवे, आदी उत्सुक आहेत. प्रभागाची रचना आणि आरक्षणामुळे अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. सिद्धार्थनगरमधून मिलिंद सरनाईक, धनंजय सावंत, महेश कदम, आदींनी तयारी केली होती. मात्र, सर्वसाधारण ओबीसी झाल्याने या प्रभागातील गणितच बदलून गेले.प्रभागात अफजल पिरजादे यांनी ताराराणी आघाडीकडून उमेदवारी मागितली आहे. त्यांनी यापूर्वीच्या महापालिकेच्या निवडणुका लढविल्या आहेत. मागील निवडणुकीत ते केवळ १५० मतांनी पराभूत झाले; तर गेल्या पाच वर्षांपासून जय पटकारे यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सिद्धार्थनगरसह जुना बुधवार पेठ तालीम, ब्रह्मपुरी, ख्रिश्चन वसाहत, आदी परिसरात सातत्याने संपर्क ठेवला आहे. याशिवाय शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या माजी नगरसेविका तेजस्विनी घोरपडे यांनी पती नागेश घोरपडे यांच्या माध्यमातून सातत्याने दहा वर्षे या प्रभागात संपर्क ठेवला आहे. या संपर्कामुळे त्यांना सिद्धार्थनगर, जुना बुधवार पेठ, ख्रिश्चन वसाहत, ब्रह्मपुरी, तोरस्कर चौक या परिसरातून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय सुशील भांदिगरे हेही शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांनीही विविध कामांच्या माध्यमातून नागरिकांशी सतत संपर्क ठेवला आहे. ताराराणी आघाडीकडून इच्छुक असणारे अफजल पिरजादे हेही गेली अनेक वर्षे महापालिकेचे प्रतिनिधित्व करण्यास इच्छुक आहेत. मागील वेळी त्यांचा दिगंबर फराकटे यांच्याकडून अवघ्या १५० मतांनी पराभव झाला. त्यांनी पराभव पचवून पुन्हा जोमाने कामास सुरुवात करीत संपर्कात सातत्य ठेवले आहे. याशिवाय अरुण खोडवे, पिरजादे यांचे चुलत बंधू लईक पिरजादे हेही निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. एकट्या सिद्धार्थनगरात २८०० इतके मतदान आहे. हे मतदानच निर्णायक ठरणार असल्याने या भागावर इच्छुकांचा डोळा आहे. या प्रभागात पंचगंगा स्मशानभूमी आहे. त्यातही काही अंशी सुधारणा होणे अपेक्षित असल्याने याची जाणीव निवडून येणाऱ्या उमेदवारांना ठेवावी लागणार आहे. अपुरी शौचालये, अशुद्ध व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने ही समस्या तर पाचवीलाच पुजलेली आहे. प्रभागात प्रामुख्याने जुन्या कोल्हापूरचा फिल असल्याने जुनी खापरीची घरे अनेक आहेत. नव्याने बांधकाम होत असल्याने ड्रेनेज सुविधा अपुरी पडत आहे. प्रभागात शिर्के उद्यान आहे. या उद्यानाची अवस्था बिकट आहे. याशिवाय प्रभागातील मुलांना खेळण्यासाठी चांगले मैदान नाही. याचा विचार निवडून येणाऱ्या नगरसेवकांना करावा लागणार आहे. निवडणुका अजूनही जाहीर न झाल्याने अनेकांनी आपले पत्ते अजूनही खिशातच ठेवले आहेत. त्यामुळे निवडणुकांची तारीख जाहीर होताच अनेक दिग्गज उमेदवार आपली उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजून तरी ‘वेट अँड वॉच’ अशीच भूमिका अनेकांनी घेतली आहे. या प्रभागात आमदार राजेश क्षीरसागर यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने शिवसेनेचे तिकीट ज्याला मिळेल, त्याला विजयी होण्याची जादा संधी, असे गणित असल्याचे जाणकार सांगत आहेत. सिद्धार्थनगरआरक्षण : सर्वसाधारण ओबीसी