शहरं
Join us  
Trending Stories
1
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
2
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
3
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
4
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
5
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
6
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
7
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
8
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
9
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
10
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
11
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
12
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
13
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
14
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
15
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
16
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
17
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
18
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
19
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
20
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
Daily Top 2Weekly Top 5

मूळच्या नेपाळी नागरिकाचे कोल्हापुरात निधन, आधार कार्ड नसल्याने अंत्यसंस्कारासाठी ८ तासांची तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 17:13 IST

नेपाळचे नागरिकत्व प्रमाणपत्र दाखवल्यावर त्यांनी रीतसर तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर त्यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी शेंडा पार्कात पाठवले

कोल्हापूर : ते मूळचे नेपाळचे. दहा-बारा वर्षे कोल्हापुरात मध्यवर्ती स्टॅण्डवरील चायनीज गाडीवर ते कूक म्हणून काम करून पोट भरत होते. दोन्ही किडन्या खराब झाल्याने त्यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांचे आधार कार्ड नसल्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल आठ तास मानवसेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या यंत्रणांकडे प्रयत्न करावे लागले. कृष्णबहाद्दर बंब (वय ४२, जि. कैलाली, नेपाळ) असे त्यांचे नाव आहे.

घडले ते असे : बंब हे पत्नी, मुलासह ताराबाई पार्कात राहत होते. त्यांच्याकडे नेपाळचे नागरिकत्व प्रमाणपत्र होते. चाजनीज गाडीवर कूक म्हणून रात्री उशिरापर्यंत काम करायचे आणि त्यातून कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा असा दिनक्रम. गेल्या काही दिवसांपासून किडनीचा त्रास वाढल्याने त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी उपचाराला फारशी संधी नसल्याने पेशंटला घरी घेऊन जावा म्हणून सांगितले. त्यामुळे त्यांना घरी आणले आणि गुरुवारी सायंकाळी ६ वाजता त्यांचे निधन झाले. मृत्यू दाखल्यासाठी स्थानिक शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी पत्र दिले; परंतु अशा नुसत्या पत्रावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असे स्मशानभूमीत सांगण्यात आले. 

मग फेरीवाले संघटनेचे नेते दिलीप पोवार यांच्याशी कुणीतरी संपर्क साधला. त्यांनी मानवसेवा संस्थेचे व फेरीवाल्यांचे कार्यकर्ते रघुनाथ कांबळे यांना ही कल्पना दिली. त्यांनी स्थानिक नगरसेवक दीपाली घाटगे यांच्याशी संपर्क साधला; परंतु तिथेही आधार कार्डशिवाय दाखला देण्यात अडचण आली. मग शाहुपुरी पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी मृतदेह सीपीआरला नेण्याचा सल्ला दिला. मृतदेह पुन्हा सीपीआरला नेण्यात आला. 

तिथे नेपाळचे नागरिकत्व प्रमाणपत्र दाखवल्यावर त्यांनी रीतसर तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर त्यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी शेंडा पार्कात पाठवले. तिथे राजारामपुरी, शाहुपुरीचे पोलिस आले, त्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. ते झाल्यावर मगच सीपीआरने मृत्यू प्रमाणपत्र दिले. ते मिळाल्यानंतर मृतदेह कदमवाडी स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले; परंतु हे सगळे करेपर्यंत मध्यरात्रीचे दोन वाजले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Nepali Man Dies in Kolhapur; No Aadhaar, Burial Delayed

Web Summary : A Nepali man, Krishna Bahaddur, died in Kolhapur. Without an Aadhaar card, arranging his funeral took eight hours. Human service organizations and police intervened to issue a death certificate and perform the last rites.