शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

दर्जाकडे दुर्लक्ष, उद्घाटनांचा श्रेयवाद

By admin | Updated: December 18, 2014 00:00 IST

राजशिष्टाचाराचा बडगा : पडद्याआडून कुरघोड्या; विकासकामांबाबत महापालिकेत रंगतेय मानापमानाचे नाट्य

संतोष पाटील - कोल्हापूर -दक्षिण आणि उत्तर अशा दोन विधानसभा मतदारसंघांत विभागलेल्या महापालिकेच्या हद्दीतील विकासकामांचे उद्घाटन कोणी करायचे? पत्रिकेत नाव कोणाचे घालायचे? यावरून जोरदार मानापमानाचे नाट्य सुरूआहे. माजी मंत्री सतेज पाटील व आमदार अमल महाडिक, तर आमदार राजेश क्षीरसागर व नगरसेवक सत्यजित कदम यांच्यात राजशिष्टाचारावरून शीतयुद्ध रंगले. विकासकामांचा बोजवारा उडाला असताना, ‘निधी मीच आणला, उद्घाटनही मीच करणार, मी भागाचा प्रतिनिधी आहे’ अशा पोकळ श्रेयवादाचे राजकारण सुरू आहे. आता रखडलेल्या कामांच्या दर्जाचेही श्रेय या नेत्यांनी घ्यावे, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.शहराच्या विकासकामांसाठी दहा कोटींचा निधी नगरसेवक सत्यजित कदम यांनी आणल्याची चर्चा आहे. मात्र, हा निधी शहरासाठी आमदारांनी खेचून आणला, असे क्षीरसागर समर्थकांचे म्हणणे आहे. निवडणुकीनंतर कदम यांनी खासदार धनंजय महाडिक यांंच्या उपस्थितीत उद्घाटनांचा सपाटा लावला. क्षीरसागर व कदम यांच्यातील उद्घाटनाचा वाद टोकाला गेल्यानंतर आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी राजशिष्टाचाराप्रमाणेच उद्घाटनाची पत्रिका काढावी, पूर्वी उद्घाटने केलेल्या कामांची उद्घाटने करू नयेत, असा आदेश प्रशासनाला दिला. आता माजी मंत्री पाटील व आ. महाडिक समर्थकांचा विकासकामांच्या उद्घाटनावरून नवा वाद सुरू आहे. पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून विकासकामांसाठी निधी आणला. या निधीतील दहा विकासकामांचे नारळ फोडण्याचे नियोजनही केले. दक्षिण व उत्तर मतदारसंघांत विभागलेल्या या विकासकामांच्या उद्घाटन पत्रिकेवर आ. महाडिक व क्षीरसागर यांचा राजशिष्टाचाराप्रमाणे उल्लेख अनिवार्य आहे. मात्र, आमदार महाडिक यांचे नाव उद्घाटन पत्रिकेतून गायब झाले. या मुद्द्याआधारे प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांवर हक्कभंगाची नोटीस बजावण्याची टूम महाडिक समर्थकांनी काढली. त्यामुळे पाटील यांच्या हस्ते होणारे नियोजित उद्घाटनांचे सर्व कार्यक्रम ऐनवेळी रद्द केले. आता विकासकामांची ‘शॉर्ट लिस्ट’ करून फक्त उत्तर मर्यादित भागातील उद्घाटने करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.रखडलेल्या कामांचे सिंहावलोकननिविदा मंजूर करतेवेळी दिसणारी प्रशासनाची घाई व त्यानंतर उद्घाटनावेळी मिरविणारे लोकप्रतिनिधी यांचा उत्साह प्रत्यक्ष कामावर लक्ष ठेवताना जाणवत नाही, असा यापूर्वीचा अनुभव आहे. श्रेयवाद घेताना मग थाटात नारळ वाढवून उद्घाटन केलेल्या, परंतु आता रखडलेल्या कामांचे सिंहावलोकनही सर्वच नेत्यांनी करावे, अशी मागणी होत आहे.श्रेयवादापेक्षा इकडेही लक्ष द्याशहरातील ७०० कोटींच्या विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. राजकीय अनास्थेमुळे काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना विविध मंजुरीत अडकली आहे. १०८ कोटींच्या एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पासह नगरोत्थान रस्ते योजना, रंकाळा प्रदूषण व मजबुतीकरण, सांडपाणी शुद्धिकरण केंद्र, पावसाळी पाणी नियोजन योजना, झोपडपट्टी सुधार योजना, ७२ कि.मी.ची ड्रेनेजलाईन, बी.ओ.टी. (बांधा-वापरा-हस्तांतरित करा)वर कचऱ्यापासून वीजनिर्मिती व कत्तलखाना, मल्टीपल पार्किंग व्यवस्था, आदी सर्व प्रकल्प चार वर्षांपेक्षा अधिक काळ रखडले आहेत.