शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कागलमध्ये निषेध, शोकसभा

By admin | Updated: February 20, 2015 23:09 IST

आबांना आदरांजली : पानसरेंवर हल्ला करणाऱ्यांना तत्काळ पकडण्याची मागणी

कागल : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाबद्दल शोकसभा आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधासाठी निषेध सभा, अशा संयुक्त सभेचे आयोजन शुक्रवारी कागल शहरात करण्यात आले होते. शाहू नगरवाचनालयात झालेल्या या सभेसाठी शहरातील प्रमुख सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गाडे होते.राष्ट्रवादी कॉँग्रेसचे भैया माने यांनी सभेचे प्रास्ताविक केले. यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाचे शामराव पाटील, मराठा महासंघाचे किरण मुळीक, शिवसेनेचे राहुल घोरपडे, किरण कुलकर्णी, प्रा. मोहन तोरगलकर, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, अतुल जोशी, मंडलिक साखर कारखान्याचे संचालक चंद्रकांत गवळी, शाहू आघाडीचे सचिव मनोहर पाटील, पक्षप्रतोद रमेश माळी यांची भाषणे झाली. नगराध्यक्षा आशाकाकी माने यांनी आभार मानले. उपस्थित वक्त्यांनी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचप्रमाणे कॉ. पानसरे यांच्यावरील हल्ला हा पुरोगामी विचारांची शक्ती संपविण्याचे कटकारस्थान असल्याचे सांगून हल्लेखोरांना त्वरित पकडावे, अशी मागणी केली. या सभेला बाळ पाटील, रघुनाथ जकाते, कागल बॅँकेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, आशाकाकी जगदाळे, शिवराज्य मंचचे इंद्रजित घाटगे, आदी मान्यवर उपस्थित होते. ( प्रतिनिधी )ुविवेकपणा संपला़?प्रकाश गाडेकर आणि इतर काही वक्त्यांनी कॉ. पानसरे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संदर्भ देत सांगितले की, हल्ला झाल्याच्या घटनेनंतर निषेधासाठी कागलमधून तत्काळ प्रतिक्रिया उमटायला हव्या होत्या. कारण ही शाहूंची जन्मभूमी आहे. मात्र, इतक्या उशिराने निषेध सभा आपण घेत आहोत, हे दुर्दैवी आहे. यामुळे कागलकरांमधील विवेकपणा संपला आहे काय? असा प्रश्न निर्माण होतो.