शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

माणसाला सक्षम करणाऱ्या संस्कृतीची गरज

By admin | Updated: June 16, 2017 22:50 IST

चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन : ‘स्वयंसिद्धा’चा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन; विविध पुरस्कारांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : एखादी व्यक्ती जोपर्यंत आर्थिक स्वरूपात कुटुंबाला हातभार लावत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीची किंमत कळत नाही. ‘स्वयंसिद्धा’ने हे आर्थिक बळ महिलांना उद्योगाच्या रूपाने दिले. आजवर आपण लोकांना हात पसरायला शिकविले, पण आता त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहायला शिकविणाऱ्या आणि त्यांना सक्षम करणाऱ्या संस्कृतीची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहात गुरुवारी स्वयंसिद्धा महिला संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर अंजली पाटील, ‘स्वयंसिद्धा’च्या संचालिका कांचन परुळेकर, सुधर्म जामसांडेकर, शैलजा काटकर, सुहास कोरगांवकर, स्मिता बेरी, गीता जाधव, अप्पासाहेब ताटे, अनिलराज जगदाळे, तृप्ती पुरेकर, सौम्या तिरोडकर, जयश्री गायकवाड उपस्थित होत्या. यावेळी अनुराधा तेंडुलकर, उमा देसाई, विलास शिंदे डॉ. सुरेश डंबोळे, इंदुताई भदरगे यांच्यासह अन्य व्यक्ती व संघटनांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, आजकालच्या पिढीने मागत बसण्यापेक्षा स्वकर्तृत्वावर मिळविण्याच्या विचाराने पुढे जाणे आवश्यक आहे. शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून अशाच पद्धतीने त्यांना उभे करीत आहे. जेव्हा देशातील प्रत्येक तरुण किमान वीस तास राबेल तेव्हाच देशाची संपत्ती वाढून प्रगती करेल. ‘स्वयंसिद्धा’ने कोणताही राजकीय हेतू अथवा लाभाची इच्छा न बाळगता महिलांचे कर्तृत्व घराबाहेर आणले आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर देशाची संपत्ती वाढविण्यासाठी, एकमेकांना सहकार्य करण्यासाठी केला.यावेळी पुरस्कारप्राप्त विलास शिंदे यांनी सह्याद्री समूहाने द्राक्ष उत्पादनावर शेतकऱ्यांची प्रगती कशी साधली याची थोडक्यात माहिती दिली. शेतीकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते, पण सकारात्मकता आणली तर शेतीसारखी समृद्धी अन्य कोणत्याही क्षेत्रांत नाही, असे मत व्यक्त केले. सुरेश डंबोळे यांनी ‘स्वयंसिद्धा’ने संस्थेच्या कार्याची दखल घेतली याबद्दल आभार मानले. कांचन परुळेकर यांनी प्रास्ताविकात ‘स्वयंसिद्धा’च्या पंचवीस वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला व लवकरच टाकाळा येथे स्वयंप्रेरिका मॉल सुरू होत असल्याची माहिती दिली. तृप्ती पुरेकर यांनी सूत्रसंचालन केले. अनुराधा तेंडुलकर यांच्याकडून लाखाची देणगी‘स्वयंसिद्धा’तर्फे सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा तेंडुलकर यांना स्मिता कोरगांवकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर तेंडुलकर यांनी ‘स्वयंसिद्धा’च्या महिला सबलीकरणाच्या कार्यासाठी त्वरित एक लाखाचा धनादेश संस्थेकडे सुपूर्द केला.कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहात गुरुवारी स्वयंसिद्धा महिला संस्थेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा तेंडुलकर यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी कांचन परुळेकर, अंजली पाटील, सौम्या तिरोडकर, जयश्री गायकवाड, तृप्ती पुरेकर उपस्थित होत्या.