शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
3
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
4
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
5
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
6
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
7
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
8
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
9
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
10
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
11
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
12
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
13
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
14
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
15
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
16
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
17
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
18
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
19
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
20
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur ZP Election 2026: चंदगडमध्ये विजयाच्या ‘बूस्टर’मुळे राष्ट्रवादीला उभारी, राजेश पाटील यांनी संयमी डावाने केली विरोधकांवर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 19:00 IST

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्याने तर माजी आमदार राजेश पाटील कोलमडून गेले होते.

निंगाप्पा बोकडे

चंदगड : तब्बल १६०० कोटींची विकासकामे करूनही विधानसभेत झालेला पराभव हा माजी आमदार राजेश पाटील यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती जाण्यामुळे तर ते परत पोरके झाल, पण अशा परिस्थितीतही न खचता त्यांनी नेटाने किल्ला लढवत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत माणगाव, तुडये व कुदनूर अशा तीन जिल्हा परिषदेच्या जागा जिंकल्या. त्यामुळे माजी आमदारांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बूस्टर डोस मिळाला आहे.

माजी आमदार राजेश पाटील हे माजी उपमुख्यमंत्री यांचे विश्वासू सहकारी होते. त्यामुळेच त्यांना कधीच खाली हात पाठविले नाही. त्याच जोरावर २०२४ ची विधानसभा लढविली, पण त्यात त्यांचा अनपेक्षित पराभव झाला. त्यामुळे माजी आमदार नाराज झाले होते. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपल्या मनातील सल बोलूनही दाखवली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. त्यात विमान अपघातात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्याने तर माजी आमदार कोलमडून गेले होते.

अशा आणीबाणीच्या परिस्थितीत आपल्या नेत्याला आपणच उभारी दिली पाहिजे या भावनेतून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जोमाने काम सुरू केले. त्याचाच परिपाक म्हणून चारपैकी माणगाव, तुडये, कुदनूर या जिल्हा परिषदेच्या जागा व माणगाव, तुर्केवाडी, कुदनूर, तुडये व हेरे अशा पंचायत समितीच्या पाच जागा मोठ्या फरकाने जिंकल्या. यामुळे माजी आमदार पाटील यांना तर उभारी मिळाली आहेच. त्याशिवाय कार्यकर्त्यांनाही दहा हत्तींचे बळ आले आहे.

विरोधी आघाडीला शह

माजी आमदार राजेश पाटील यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे तरीही विधानसभा व चंदगड नगरपंचायतीमध्ये पराभव झाला, पण खचून न जाता त्यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अनेकांचा करेक्ट कार्यक्रम करत आमदार शिवाजी पाटील, माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, गोपाळराव पाटील व मानसिंग खोराटे यांच्या विरोधी आघाडीला शह दिला.

टायगर अभी जिंदा हैं

अनेक आघातांमुळे माजी आमदार राजेश पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खचले होते. तरीही त्यांनी अशा बिकट परिस्थितीतही आपल्या नेत्याच्या पाठीशी खंबीर ताकद उभी केली. त्यातून त्यांचा विजय सुकर करून ‘टायगर अभी जिंदा हैं’ हे दाखवून दिल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Boost for NCP in Chandgad: Rajesh Patil's victory silences rivals.

Web Summary : Despite past setbacks, Rajesh Patil's NCP secured ZP wins in Chandgad, revitalizing party workers. He outmaneuvered opposition, proving his strength.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण