शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

‘पद्माराजे’त राष्ट्रवादीचा उमेदवार द्या

By admin | Updated: August 14, 2015 00:05 IST

हसन मुश्रीफ : प्रभागातील नेत्यांनी एकत्रित बसून निर्णय घेण्याचे आदेश

कोल्हापूर : सध्या शहरातील चर्चेत असलेल्या शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यान प्रभागातून राष्ट्रवादीचा उमेदवार असलाच पाहिजे, असा आग्रह गुरुवारी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत धरला. काहीही ठरवा, पण राष्ट्रवादीचा उमेदवार या प्रभागात असलाच पाहिजे यादृष्टीने प्रयत्न करा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. मुश्रीफ यांनी गुरुवारी सकाळी कागल येथील विश्रामगृहावर ज्येष्ठ नेते आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर, उपमहापौर ज्योत्स्ना पवार-मेढे, स्थायी समिती सभापती सर्जेराव पाटील, माजी सभापती आदिल फरास, नगरसेवक उत्तम कोराणे, माजी नगरसेवक अजित राऊत, संजय कुऱ्हाडे, संजय पडवळे, आदी कार्यकर्त्यांशी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करून आढावा घेतला. शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यान प्रभागात नगरसेविका सुनीता राऊत यांचे पती अजित राऊत हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, परंतु स्थानिक वेताळ तालमीच्या राजकारणातून त्यांना थांबविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांच्याऐवजी भाजपचे कार्यकर्ते रामभाऊ चव्हाण यांचे पुतणे अजिंक्य चव्हाण हे निवडणूक लढविणार आहेत. या विषयावरही यावेळी चर्चा झाली. अजित राऊत व उत्तम कोराणे यांच्याशी चर्चा करताना मुश्रीफ यांनी या प्रभागातून राष्ट्रवादीचा उमेदवार असलाच पाहिजे, असा आग्रह धरला. माजी नगरसेवक बबनराव कोराणे, रामभाऊ चव्हाण यांच्याशी अजित राऊत, उत्तम कोराणे यांनी चर्चा करावी आणि निर्णय घ्यावा, असे सुचविले.दोन दिवसांत निर्णय होणारया बैठकीत मुश्रीफ यांनी जर अजिंक्य चव्हाण निवडणूक लढविणार असतील, तर त्यांनी राष्ट्रवादीकडून लढावे, अन्यथा त्यांच्याविरोधात अजित राऊत यांनीच पक्षातर्फे उभे राहावे, असे सुचविले असल्याचे समजते. येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय घ्यावा, असे मुश्रीफ यांनी सांगितले आहे.