शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नाव हायब्रिड... पण काम कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:02 IST

संजय पारकर / लोकमत न्यूज नेटवर्क / राधानगरी : हायब्रिड-अ‍ॅन्युइटी योजनेतून होत असलेल्या निपाणी-दाजीपूर या आंतरराज्य रस्त्याच्या कामाची ...

संजय पारकर / लोकमत न्यूज नेटवर्क / राधानगरी :

हायब्रिड-अ‍ॅन्युइटी योजनेतून होत असलेल्या निपाणी-दाजीपूर या आंतरराज्य रस्त्याच्या कामाची दोन वर्षांची मुदत संपली तरीही अजून अर्धेही काम झालेले नाही. वेळेत काम होत नसल्याने ठेकेदाराला दररोज सव्वा लाख रुपये दंड आकाराला जात आहे. यापोटी बिलातून दीड कोटीची वसुली करण्यात आली आहे. तरीही या कामाला आवश्यक गती मिळत नाही. कामाला कोरोनामुळे काही महिने मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

७० किलोमीटर अंतराचे हे काम पुण्यातील जितेंद्रसिह कंपनीला मिळाले आहे. डिसेंबर २०१८ मध्ये त्याची सुरुवात झाली. मात्र सुरुवातीपासूनच काम कासवगतीने सुरू आहे. दोन वर्षांत जेमतेम ५० टक्के काम झाले आहे. याच योजनेतील कोल्हापूर-परिते-मुदाळ हे ५० कि.मी.चे कामही या कंपनीकडे आहे. मोठे काम असले तरी त्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे रस्त्यांची व मोऱ्यांची जागोजागी केलेली खुदाई व त्यामुळे वाहतुकीची कोंडी, वाहनधारकांचे सुरू असलेले हाल असे चित्र या दोन्ही मार्गांवर सर्वत्र आहे.

नागरिकांच्या तक्रारीनंतर आमदार प्रकाश आबिटकर यांनी दोन महिन्यांपूर्वी पाहणी करून आढावा घेतला होता. त्यांनी ठेकेदार बदलण्याची मागणी केली होती. त्यामुळे याच्या चौकशीसाठी नाशिक विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर-मुदाळ या मार्गाच्या कामाला उशिरा सुरुवात झाल्याने हे काम या कंपनीकडून काढून घेण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे.

चौकट- भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यावर २०१४ मध्ये ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. ६० टक्के रक्कम शासन देणार व ४० टक्के रक्कम ठेकेदाराने गुंतवायची. शासन ही रक्कम पुढे दहा वर्षांत देणार असे याचे स्वरूप आहे. त्या काळी नवीनच योजना असल्याने ठेकेदारांचा प्रतिसाद नव्हता. सिंधुदुर्ग विभागातील याच रस्त्याचे काम त्यामुळे रद्द झाले आहे. २०१४ च्या अंदाजपत्रकाप्रमाणे काम करावे लागणार असल्याने ठेकेदारही आतबट्ट्यात जाणार आहे. त्यामुळे जुना ठेका रद्द केला तरी नवीन ठेकेदार मिळणे अशक्य आहे.

फोटो ओळ- निपाणी-दाजीपूर रस्त्याचे काम कासवगतीने सुरू असल्याने राधानगरी बाजारपेठेत रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. येथील तहसीलदार कार्यालयासमोर गटारीचे पाणी असे रस्त्यातून वाहते.