शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

नागोजीराव, जवाहर हायस्कूल विजयी

By admin | Updated: August 5, 2014 00:15 IST

मनपास्तर शालेय फुटबॉल स्पर्धा : खेळाडूंचा अपूर्व उत्साह

कोल्हापूर : पोलीस परेड मैदानावर आज, सोमवारी झालेल्या मनपास्तर १४ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत नागोजीराव पाटणकर, जवाहर, आयर्विन, न्यू इंग्लिश, राधाबाई शिंदे, भारती विद्यापीठ, हनुमान चाटे, महावीर स्कूल, चाटे, मगदूम, शिवाजी मराठा हायस्कूल यांच्यासह अन्य तीन संघांनी आगेकूच केली. कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेचे उद्घाटन राखीव पोलीस दलाचे निरीक्षक महादेव गडदे, मनपा प्राथमिक शिक्षण उपसभापती महेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी नवनाथ फरताडे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचा निकाल असा : नागोजीराव पाटणकर हायस्कूलने देशमुख हायस्कूलवर २-०ने मात केली. सिद्धेश ढेरे व पियुष शिंदेने प्रत्येकी एक गोल केला. जवाहर हायस्कूलने शाहू दयानंद हायस्कूलवर १-०ने मात केली. यामध्ये प्रथमेश माटुंगे यांनी गोल केला. आयर्विन खिश्चन हायस्कूलने कोरगावकर हायस्कूलवर २-० ने मात केली. वैभव गायकवाडने प्रत्येकी दोन गोल केले. न्यू इंग्लिश स्कूल, संभाजीनगरने जय भारत हायस्कूलवर १-० ने मात केली. यामध्ये खलील मोमीनने गोल केला. भारती विद्यापीठ हायस्कूलने प्रायव्हेट हायस्कूलवर १-० ने मात केली. सर्वेश कलागतेने गोल केला. हणमंतराव चाटे (इंग्रजी) हायस्कूलने पाटणे हायस्कूलवर टायब्रेकवर २-०ने मात केली. महावीर हायस्कूलने विमला गोयंकावर १-० ने मात केली. प्रथमेश मोरेने १ गोल केला. शिवाजी मराठा हायस्कूलने नेहरू हायस्कूलवर टायब्रेकरवर १-० ने मात केली. न्यू मॉडेलने शाहू विद्यालयावर टायब्रेकवर १-० ने मात केली. हणमंतराव चाटे (मराठी) हायस्कूलने हरिहर हायस्कूलवर २-० ने मात केली. तेजस राणे व अजिंक्य कोठारी यांनी प्रत्येकी एक गोल केला. मगदूम हायस्कूलने कोल्हापूर इंग्लिश मेडियम स्कूलवर टायब्रेकरवर मात केली. यावेळी उदय पवार, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, प्रदीप साळोखे, दिग्विजय नाईक, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)