शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

मायबाप सरकार आमचंसुद्धा हातावरच पोट हाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 5:49 PM

CoronaVirus Kolhapur: रिक्षा व्यावसायिक, फेरीवाले यांच्याप्रमाणे आमचं पोटही हातावरचंच आहे. त्यामुळे राज्य सरकारने फूल ना फुलाची पाकळी म्हणून लॉकडाऊन काळात तातडीचे अनुदान द्यावे, अशी आर्त हाक सलून कामगारांच्यावतीने महाराष्ट्र नाभिक महामंडळाने सरकारला घातली आहे.

ठळक मुद्दे सलून कामगारांनाही अनुदान द्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाची मागणी

कोल्हापूर : रिक्षा व्यावसायिक, फेरीवाले यांच्याप्रमाणे आमचं पोटही हातावरचंच आहे. त्यामुळे राज्य सरकारने फूल ना फुलाची पाकळी म्हणून लॉकडाऊन काळात तातडीचे अनुदान द्यावे, अशी आर्त हाक सलून कामगारांच्यावतीने महाराष्ट्र नाभिक महामंडळाने सरकारला घातली आहे.कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता कोल्हापूरात ९५०० हून अधिक सलून दुकाने आहेत. या दुकानांमध्ये सरासरी दोन कामगार असून त्यांना झालेल्या कामापैकी काही टक्के मेहनताना पगार म्हणून दिला जातो. त्यातून ते आपला घर खर्च चालवितात. हा हिशोब रोजचा असल्यामुळे काम करेल त्याप्रमाणेच सलून मालक त्यांना हा मेहनताना अदा करीत असतात. मात्र, यंदाच्या लॉकडाऊनची परिस्थिती काही वेगळीच आहे.

गेल्या लॉकडाऊन काळात तीन महिने हाताला काम नव्हते म्हणून अनेक सलून व्यावसायिकांनी कामगारांना अंगावर पैसे दिले. काहींनी अंगावर बँका, पतसंस्था, सोसायटी आणि सावकारांकडून नियमित काम सुरू होईल अशी भाबडी आशा मनी धरून कर्जे काढली. त्यानंतर काही महिने सुरळीत हफ्तेही गेले. पुन्हा कोरोनाचा कहर वाढू लागला. तशी मनात पुन्हा सलून दुकाने बंद होण्याची धास्ती वाढली आणि त्याप्रमाणे गुरुवारपासून लॉकडाऊन झाले.

त्यात राज्य सरकारने फेरीवाले, असंघटित कामगार, रिक्षा व्यावसायिकांना अनुदान देऊन दिलासा दिला. मात्र, यातून सलून व्यावसायिकांना डावलले. त्यामुळे आता घर खर्च आणि संसाराची गाडी कशी चालवायची असा यक्ष प्रश्न सलून कामगारांपुढे उभा राहिला आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाने अशा सलून कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ नये, याकरीता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे. दरम्यान, महामंडळातर्फे गुरुवारी यासंदर्भात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देण्यात आले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर