शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातही संगीत कलाकार

By admin | Updated: January 19, 2015 00:49 IST

हृदयनाथ मंगेशकर : दत्तवाडमध्ये राज्यस्तरीय संगीत गायन स्पर्धा उत्साहात

कुरुंदवाड : भारतीय संगीताची जाण नव्या पिढीला व्हावी व संगीत पुढे नेणारे कलाकार निर्माण होण्यासाठी दत्तवाड दत्त भजनी मंडळाने संगीत गायन स्पर्धेचा घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमाने ग्रामीण भागातही संगीत कलाकार निर्माण होतील, असा विश्वास भावगंधर्व पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केला.दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दत्त भजनी मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय लहान व खुल्या गटातील संगीत गायन स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार सा. रे. पाटील होते. यावेळी दत्तवाड ग्रामस्थ व संयोजन समितीच्यावतीने पं. हृदयनाथ मंगेशकर यांना भगवान विभूती बाबा महाराज संगीतरत्न, तर माजी आमदार पाटील यांना योगीराज दत्तगुरू समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत पुणे, मुंबई, ठाणेसह राज्यातील कानाकोपऱ्यांतून स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये लहानात लहान ७ वर्षे ते ८० वर्षे वयोवृद्ध गायकांच्या सुमधुर वाणीचा आस्वाद दत्तवाडसह परिसरातील संगीत श्रोत्यांनी घेतला. राज्यस्तरीय संगीत गायन स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे- लहान गट - प्रथम - ओंकार पाटील (नेसरी), द्वितीय - समृद्ध कांबळे (आजरा), तृतीय - केदार सोहणी (गडहिंग्लज), उत्तेजनार्थ - योगेश मुळे (नांदणी) व युगंधरा केचे (औरंगाबाद). खुल्या गटाचा निकाल - प्रथम - संपदा माने (कोल्हापूर), द्वितीय - श्रेया सोंदर (ठाणे), तृतीय- स्वरूपा बर्वे (कोल्हापूर) उत्तेजनार्थ - किमया लोलेकर (पुणे), धनश्री गाडगीळ (सांगली). स्पर्धेचे परीक्षक म्हणून ऋषिकेश बोडस, डॉ. भारती वैशिपायन व विनोद ठाकूर-देसाई यांनी काम पाहिले. यावेळी दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, प. पू. अदृश्य शिवयोगी बाबा महाराज, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बंडा माने, कर्णसिंह घोरपडे-सरकार, सरपंच लक्ष्मी माने, स्पर्धाप्रमुख दिलीप शेंडे, गिरीश कुलकर्णी, मंडळाचे अध्यक्ष अशोक सुतार, आदी उपस्थित होते. नियोजन समिती स्वागताध्यक्ष चंद्रशेखर कलगी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.