पालिकेने सहाय्यक अनुदान केवळ वेतन व भत्त्यासाठी वापरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:28 IST2021-09-23T04:28:05+5:302021-09-23T04:28:05+5:30

इचलकरंजी : येथील नगरपालिकेने राखीव निधी सहाय्यक अनुदानाची रक्कम केवळ पालिकेचे कर्मचारी व सेवानिवृत्त यांचे वेतन, भत्ते यासाठीच वापरावेत. ...

The municipality should use the subsidy only for salary and allowance | पालिकेने सहाय्यक अनुदान केवळ वेतन व भत्त्यासाठी वापरावे

पालिकेने सहाय्यक अनुदान केवळ वेतन व भत्त्यासाठी वापरावे

इचलकरंजी : येथील नगरपालिकेने राखीव निधी सहाय्यक अनुदानाची रक्कम केवळ पालिकेचे कर्मचारी व सेवानिवृत्त यांचे वेतन, भत्ते यासाठीच वापरावेत. त्याचा इतरत्र कोठेही विनियोग करू नये, या मागणीचे निवेदन इचलकरंजी नगरपरिषद सर्व कामगार कृती समितीने नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविले. तसेच बुधवारी नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांनाही दिले. यावेळी सहाय्यक अनुदानातून वेतन व भत्ते न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

निवेदनात, शासन निर्णयानुसार सहायक अनुदानाची रक्कम प्राधान्याने कर्मचाऱ्यांचे व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते यासाठी वापरणे बंधनकारक आहे. त्यानुसार मुख्याधिकारी यांना सहायक अनुदानातून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे वेतन राखीव निधीमध्ये भरपाई करावयाची रक्कम सहाय्यक अनुदानातून करता येणार नसल्याने तो पालिकेच्या इतर उत्पन्नाच्या स्त्रोतातून भरपाई करावी. तसेच चतुर्थवर्ग कर्मचाऱ्यांना वगळता अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यां ऑगस्ट महिन्याचा पगार न झाल्याने आंदोलन करण्याची वेळ आली होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून नगरपालिकेला मिळणाऱ्या सहाय्यक अनुदानातून प्राधान्यक्रमानुसार कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन व सेवानिवृत्तांचे वेतन अदा करावे, असे म्हटले आहे.

Web Title: The municipality should use the subsidy only for salary and allowance