शहरं
Join us  
Trending Stories
1
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
2
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
5
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
6
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
7
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
8
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
9
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
10
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
11
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
12
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
13
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
14
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
15
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
16
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
17
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
18
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
19
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या हॉस्पिटल्सची झाडाझडती

By admin | Updated: January 14, 2015 00:26 IST

‘स्थायी’च्या सदस्यांची मोहीम : गंभीर त्रुटींची दखल; आरोग्य यंत्रणेची यशस्वी शस्त्रक्रिया करू : फरास

कोल्हापूर : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले, आयसोलेशन व पंचगंगा रुग्णालयांना आज, सोमवारी स्थायी समिती सभापती आदिल फरास व नगरसेवकांनी भेटी दिल्या. काही ठिकाणी आवश्यक मशिनरी, औषध साठा, इमारतीच्या दुरुस्तीची गरज असल्याचे मत फरास यांनी पाहणीनंतर सायंकाळी महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मात्र, कामचुकार कर्मचारी व आर्थिक साखळीत अडकलेले यंत्रणेतील ‘झारीतील शुक्राचार्यां’मुळेच आरोग्य यंत्रणेला अवकळा आली आहे. अखेरची घटका मोजत असलेल्या या आरोग्य यंत्रणेची यशस्वी शस्त्रक्रिया करून सक्षम करण्यास अग्रक्रम राहणार असल्याचे फरास यांनी यावेळी नमूद केले.मनपाची शहरातील मोठी महत्त्वाची तीन व प्रभागातील लहान १४ रुग्णालये अद्ययावत करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधनसामग्री व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभेसमोर सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना फरास यांनी भेटीदरम्यान दिल्या. यावेळी नगरसेवक सचिन चव्हाण, प्रकाश गवंडी, राजू हुंबे, शारंगधर देशमुख, संभाजी जाधव, इंद्रजित बोंद्रे, नगरसेविका संगीता देवेकर, ज्योत्स्ना मेढे, प्रभा टिपुगडे, माधुरी नकाते, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

शहरातील नामवंत वैद्यकीय तज्ज्ञांना मनपाच्या रुग्णालयांत आठवड्यातून दोन दिवस मोफत सेवा देण्याबाबत विनंती केली आहे. अनेकांनी होकार कळविला आहे. महापौरांच्या अध्यक्षतेखाली लवकरच याबाबत बैठक घेऊ. सुरक्षेच्या कारणास्तव सोडून गेलेल्या अकरा वैद्यकीय तज्ज्ञांना पुन्हा सेवेत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोग्य यंत्रणेच्या आडवे येणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. अचानक भेटींचे सत्र सुरू ठेवून यंत्रणेला सजग ठेवण्याचा प्रयत्न राहील. त्यासाठी स्थायी सदस्यांचे पाठबळ आहेच, नगरसेवकांचेही सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- आदिल फरास,
स्थायी समिती सभापती


पंचगंगा रुग्णालय
तब्बल ३० लाख रुपये खर्चून पंचगंगा रुग्णालयाचा कायापालट केला. मात्र, डॉक्टर्सच्या कमतरतेमुळे रुग्णालयात फक्त दोनच रुग्ण आढळले. पिण्याच्या पाण्याच्या टाकीला गळती लागल्याने रुग्णालयामध्ये पाणीटंचाई आहे. सोलर यंत्रणेतही बिघाड झाला आहे. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना सोयीचे असलेल्या रुग्णालयात रुग्णांची वर्दळ वाढविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.


आयसोलेशन रुग्णालय
शहरापासून लांब व निर्जन ठिकाणी असल्याने रुग्णालयास भुरट्या चोरांचा मोठा त्रास होत आहे. कर्मचारी व वैद्यकीय तज्ज्ञांची कमतरता आहे. रात्रीच्या वेळी आलेल्या रुग्णांना प्रवेश नाकारला जातो. दारे मोडकळीस आली आहेत. सुरक्षा रक्षक नेमून परिसरातील अवैध वावर रोखण्याचे प्रशासनाला प्रयत्न करावे लागणार आहेत.


सावित्रीबाई फुले रुग्णालय
नगरसेवक ांच्या भेटीमुळे पाहणी केल्याने मनपाची सुस्तावलेली आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. रुग्णालयात सर्वांत अधिक भोंगळ कारभार असल्याचे निदर्शनास आले. डॉक्टर्स वेळेवर कामावर येत नाहीत. वॉर्डबॉयची नेमणूक असलेला एक्स रे मशीन चालवितो. कर्मचारी संघटनेच्या धाकाने अनेकजण फक्त मस्टरवर सही करून पगार लाटतात. दवाखान्याच्या इमारतीला गेल्या २५ वर्षांत रंग लागलेला नाही. सदस्यांसमोर कर्मचाऱ्यांनी तक्रार करू नये यासाठी दोन दिवसांपासूनच फिल्डिंग लावण्यात आली होती. सदस्यांनी काही कर्मचाऱ्यांशी बंद खोलीत चर्चा करून दवाखान्याची माहिती घेतली.


आर्थिक साखळी
गर्भवती महिलांसाठी थॉयरॉईडची चाचणी गरजेची नसते. मात्र, निव्वळ कमिशनसाठी थॉयरॉईडसह इतर सोनोग्राफी चाचण्या रुग्णांवर लादल्या जातात. या चाचण्यांतून मिळणाऱ्या कमिशनचा धनादेश आगाऊ दिला जातो. यंत्रणेत मोठी आर्थिक साखळी अडकलेली आहे. कमिशनपोटी हे सर्व केले जात असल्याने प्रत्येक आठवड्यात ओळखीचे रुग्ण पाठवून यंत्रणेवर लक्ष ठेवणार असल्याचे फरास यांनी स्पष्ट केले.
रुग्णालयातील प्रयोगशाळा, सोनोग्राफी मशिनरी, एक्सरे मशीन आदींसह शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साम्रगीची दुरुस्ती व नव्याने खरेदी करावी लागणार आहे. रुग्णालयांकडे तब्बल १२००हून अधिक कर्मचारी
आहेत. ही सर्व यंत्रणा उपलब्ध असूनही
आरोग्य सेवेची जाण नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे भेटीदरम्यान नगरसेवकांच्या ध्यानात आले.