शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

मुळीक यांचा अपमान म्हणजे मराठा समाजाचा अपमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रुकडी माणगाव : अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह इतिहास संशोधक इंद्रजित सावंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रुकडी माणगाव : अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्यावर मराठा आरक्षण संबंधित करण्यात येत असलेले बेछूट आरोप व त्यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्य म्हणजे मराठा समाजाच्या अपमान आहे, असे संतप्त प्रतिक्रिया मराठा महासंघाचे जिल्हा संघटक मिलिंद ढवळे पाटील यांनी दिले. ते उपाध्यक्ष मुळीक यांच्यावर आक्षेपजनक केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुका मराठा महासंघाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीत बोलत होते.

कोल्हापूर येथे दि. २४ रोजी झालेल्या बैठकीत एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याने उपाध्यक्ष वसंतराव मुळीक व इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्याविषयी अनुद‌्गार काढले होते. या अनुद‌्गारांचा खरपूस समाचार या बैठकीत घेण्यात आले.

याप्रसंगी मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता वसंतराव मुळीक व संशोधक इंद्रजित सावंत यांचे योगदान सर्वश्रुत आहे. कोरोना संसर्गामुळे मुळीक व त्यांच्या परिवारातील अनेक सदस्य बाधित असून ते स्वतः गेले १० दिवस उपचार घेत आहेत. कुटुंब चिंतातुर असताना व या आजारामुळे वसंतराव मुळीक आणि इंद्रजित सावंत हे उपस्थित नसल्याची संधी साधून एका बाजारबुणग्याने थेट दुकानदारीचा आरोप करून संपूर्ण समाजाचाच अवमान केल्याची भावना मराठा समाजात झालेली आहे. स्वत:च्या प्रसिद्धीची हाव असलेला व समाजात फूट पाडण्यासाठीच अशी पिलावळ सोडण्यात येत असल्याची उदाहरणे आहेत. त्यांतीलच हा एक महाभाग आहे, असे प्रसिद्धीपत्रकही दिले. या प्रसिद्धीपत्रकावर जिल्हा संघटक मिलिंद ढवळे-पाटील ,दीपक पाटील, तालुका संघटक जयसिंग शिंदे, अमोल निगवे, विजय शिंदे, प्रल्हाद पाटील ,मच्छिंद्र पाटील, गोगा बाणदार, प्रकाश तोडकर, नचिकेत पाटील, राम पाटील, विनोद पाटील, बाजीराव हवालदार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.