मोरे यांच्या निधनाने हमीदवाड्याच्या सामाजिक क्षेत्रात पोकळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:24 IST2021-05-23T04:24:13+5:302021-05-23T04:24:13+5:30

मोरे यांचा जन्म २४ मार्च १९४४ रोजी हमीदवाडा येथील शेतकरी कुटुंबात झाला. वयाच्या २०व्या वर्षांपासूनच समाजकारण आणि तरुणांचे संघटनकौशल्य ...

More's demise left a void in the social sphere of Hamidwada | मोरे यांच्या निधनाने हमीदवाड्याच्या सामाजिक क्षेत्रात पोकळी

मोरे यांच्या निधनाने हमीदवाड्याच्या सामाजिक क्षेत्रात पोकळी

मोरे यांचा जन्म २४ मार्च १९४४ रोजी हमीदवाडा येथील शेतकरी कुटुंबात झाला. वयाच्या २०व्या वर्षांपासूनच समाजकारण आणि तरुणांचे संघटनकौशल्य त्यांना लाभले होते. त्यांनी शिवराज तरुण मंडळाची स्थापना करून युवकांना एकसंध केले. दिवगंत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या कार्यप्रणालीने भारावलेल्या मोरे यांनी त्यांना राजकीय जीवनात हयातभर बळ दिले.

हमीदवाडा गावच्या सामाजिक उन्नतीत महत्त्वपूर्ण वाटा उचलताना त्यांनी श्री चौंडेश्वरी दूध संस्थेच्या उभारणीमध्ये योगदान देत २५ वर्षे संचालक राहिले. तसेच, नवजीवन सेवा संस्थेत १० वर्षे संचालक म्हणून कार्यरत होते.

दूध संस्थेत मापाडी म्हणून काम करीत त्यांनी सामाजिक कार्यातही नेहमीच पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांना गावकऱ्यांनी दहा वर्षे ग्रामपंचायत सदस्यपदी विराजमान केले; तर कै. मंडलिक यांनी आपल्यासोबत सावलीप्रमाणे कार्यरत असणाऱ्या मोरे यांना २०१२ मध्ये कारखान्याचे संचालकपद देऊन बक्षीस देऊ केले; तर निष्ठेचे फळ म्हणून खासदार संजय मंडलिक यांनीही २०१७ मध्ये पुन्हा आपल्यासोबत संचालक मंडळात बिनविरोध निवड करून सन्मानित केले. त्यांनी निष्ठा आणि व्रतस्थपणे केलेले कार्य आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी आहे. त्यांच्या मृतात्म्यास सदगती लाभो हीच प्रार्थना...!

शब्दांकन- दत्तात्रय पाटील, म्हाकवे

Web Title: More's demise left a void in the social sphere of Hamidwada