शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पैशाचे वाटप; वळंजूंच्या बंगल्याची झडती

By admin | Updated: October 16, 2014 00:48 IST

दोघे संशयित तरुण ताब्यात : जवाहरनगर येथे वळंजू यांच्या बंगल्यासभोवती प्रचंड पोलीस बंदोबस्त

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील जवाहरनगर, दत्त कॉलनी, शिरत मोहल्ला येथे आमदार महादेवराव महाडिक यांचे खंदे कार्यकर्ते माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्या ‘लक्ष्मी आनंद’ बंगल्यातून पैसे घेऊन ते मतदारांना वाटप करीत असल्याच्या संशयावरून दोघा तरुणांना माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी स्वत: पकडले. त्यानंतर दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयित प्रवीण बाबासाहेब व्हटकर (वय ३९, रा. जवाहरनगर) व नितीन पाटील अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, या प्रकाराचे वृत्त शहरात पसरताच पाटील व महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली. पाटील यांनी पोलिसांकडे तक्रार करताच काही क्षणांतच अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल हे केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांसह क्राइम ब्रँच यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पोलीस व निवडणूक भरारी पथकाने वळंजू यांच्या बंगल्याची व वाहनांची सुमारे दोन तास कसून तपासणी केली असता संशयास्पद काहीही मिळून आले नसल्याची माहिती भरारी पथकाचे प्रमुख एस. के. माने यांनी दिली. अशी घडली घटना संवेदनशील जवाहरनगर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया सुरू होती. दुपारी तीनच्या सुमारास येथील दत्त कॉलनी, शिरत महोल्ला येथे महिला मतदानासाठी हातामध्ये पांढऱ्या रंगाची पाकिटे घेऊन जात असल्याचे माजी गृहराज्यमंत्री पाटील यांच्या कार्यकर्त्यांना दिसले. त्यांनी चौकशी केली असता आम्हाला माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्या घरातून पाकिटाचे वाटप सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार कार्यकर्त्यांनी पाटील यांना फोनवरून हा प्रकार सांगितला. ते काही क्षणांतच वळंजू यांच्या घरासमोर आले. त्यांच्यासोबत नगरसेवक सचिन चव्हाण, प्रदीप उलपे होते. यावेळी घरातून बाहेर पडणारे दोन तरुण त्यांना पाहून पळून निघाले. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी दोघांना पकडले. या प्रकाराची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच पाटील यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी पोलीस व भरारी पथकाकडे तक्रार केली. अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पोलीस निरीक्षक अमृत देशमुख, क्राईम ब्रँचचे अनिल देशमुख यांच्यासह राज्य राखीव दलाची तुकडी घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी कार्यकर्त्यांना पांगविले. भरारी पथकाचे प्रमुख संजय भोसले यांना वळंजू यांच्या घरासमोर पांढऱ्या रंगाचे पाकीट सापडले. त्यामध्ये पाचशे रुपयांची नोट होती. पाकिटावर ‘बी’ असा कोडवर्ड होता, तर भरत तपासे असे नाव कोपऱ्यामध्ये लिहिले होते. त्यावरून पोलीस व भरारी पथकाचे प्रमुख संजय भोसले व एस. के. माने यांनी वळंजू यांच्या घराची व घरासमोर उभ्या असलेल्या आॅल्टो, स्कार्पिओ व अक्टिव्हा या तीन वाहनांची कसून तपासणी केली असता काही संशयास्पद मिळून आले नाही. दरम्यान, याप्रकरणी भोसले यांनी वळंजू यांच्या घरासमोर संशयास्पदरीत्या मिळून आलेल्या पाचशे रुपयांच्या पाकिटावरून राजारामपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद दिली. ‘ए’ आणि ‘बी’चा फॉर्म्युला जवाहरनगर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पैसे वाटप सुरू असल्याची कुणकुण पोलिसांना होती. त्यानुसार पोलीस व निवडणूक कार्यालयाचे भरारी पथक या परिसरावर लक्ष ठेवून होते. आज मिळून आलेल्या पाकिटावर ‘बी’ अक्षर असलेला कोडवर्ड मिळून आला. ‘ए’ म्हणजे एक हजार व ‘बी’ म्हणजे पाचशे रुपये असा कोडवर्ड असल्याची चर्चा परिसरात होती. उडी मारली अन् पाय मोडलानंदकुमार वळंजू यांच्या बंगल्यातून बाहेर पडताना गृहराज्यमंत्री सतेज पाटील व त्यांचे कार्यकर्ते बाहेर थांबलेले पाहून संशयित प्रवीण व्हटकर व नितीन पाटील हे दोघेजण पाठीमागील बाजूने पळून निघाले. यावेळी नगरसेवक प्रदीप उलपे यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांचा पाठलाग केला. बंगल्याच्या संरक्षित भिंतीवर प्रवीण याने उडी मारली आणि त्याचा पाय मोडला. तेवढ्यात कार्यकर्त्यांनी दोघांनाही पकडले. तपासात निष्पन्न झाल्यास अटकमाजी महापौर वळंजू यांच्या घरासमोर पाचशे रुपये असलेले पाकीट मिळून आले आहे. भरारी पथकाचे प्रमुख संजय भोसले यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल केला आहे. संशयित दोन कार्यकर्ते ताब्यात आहेत. कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. वळंजू यांचा काही सहभाग आढळून आल्यास त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी दिली. गृहराज्यमंत्र्यांकडून घरात घुसून धक्काबुक्की : वळंजूमाजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून माझ्यासह कुटुंबातील व्यक्तींना धक्काबुक्की केल्याची तक्रार राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली असल्याचे माजी महापौर नंदकुमार वळंजू यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. याबाबत राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल नसल्याचे सांगितले.