शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी लसीकरणाचे राष्ट्रीय धोरण तयार करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सेनापती कापशी : जगातील अनेक देशांत लसीकरण वेगाने पूर्ण झाल्याने तेथील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. पंतप्रधान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सेनापती कापशी : जगातील अनेक देशांत लसीकरण वेगाने पूर्ण झाल्याने तेथील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचे व्यापक राष्ट्रीय धोरण तयार करण्याची गरज आहे. येत्या सहा महिन्यांच्या आत प्रत्येक नागरिकाला लस मिळेल, याचे नियोजन करा, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

सेनापती कापशी (ता. कागल) येथे कोरोना आढावा बैठकीत मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी सेंट झेवियर स्कूलच्या २००६ च्या तुकडीचा माजी विद्यार्थी हर्षवर्धन जयवंतराव पाटील व त्यांच्या मित्रपरिवाराने वीस लाख रुपये खर्चून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कोविड केअर केंद्रांना भेट दिल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांच्याहस्ते त्यांचा सत्कार झाला.

कोरोनाचा हा विषाणू सातत्याने बदलणारा आणि धोक्याची तीव्रता वाढवणारा आहे. केंद्र सरकार पुढे येणार नाही, तोपर्यंत लसीकरणाचा प्रश्न सुटणारच नाही. याला आंतरराष्ट्रीय कंपन्या दाद देणारच नाहीत. राज्या-राज्याला जरी परवानगी दिली, तरी या कंपन्या राज्याबरोबर बोलायला तयारच नाहीत. यासाठी एक सुसूत्र धोरण करून सहा महिन्यांत १३० कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण कसे होईल, याची दक्षताही केंद्र सरकारने घेण्याची आवश्यकता आहे.

लोक पैसे द्यायला तयार आहेत. अनेक कारखानदार मला भेटले. ते आपल्या पैशाने आपल्या कामगारांचे लसीकरण करण्यास तयार आहेत. आपण सरकारी रुग्णालयात येणाऱ्या गरीब लोकांना मोफत आणि बाहेर लस घेणाऱ्याला पैसे घेऊन दिली, तर मला वाटते, सरकारचा पैसा वाचेल आणि लवकरात लवकर लसीकरण पूर्ण होईल.

बैठकीला प्रांताधिकारी प्रसेन्नजित प्रधान, तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता पाटील, कागलचे मुख्याधिकारी पंडित पाटील, मुरगूडचे मुख्याधिकारी हेमंत निकम, सरपंच सौ. श्रद्धा कोळी, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैय्या माने, जि. प सदस्य सौ. शिल्पाताई खोत, पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर, शशिकांत खोत, प्रवीण काळबर, प्रदीप चव्हाण आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत सुनील चौगुले यांनी केले

फोटो

सेनापती कापशी (ता. कागल) येथे कागल तालुकास्तरीय आढावा बैठकीत येथे झालेल्या नवीन कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन प्रदान करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ. यावेळी प्रांताधिकारी प्रसेनजित प्रधान, तहसीलदार शिल्पा ठोकडे, सौ. शिल्पाताई खोत व इतर प्रमुख उपस्थित होते.

फोटो - संदीप तारळे