शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात दिवे पेटवून मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 10:44 IST

कोरोना विरोधातील लढाईत कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने ९ मिनिटे वीज बंद ठेवून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले.

ठळक मुद्देकोल्हापुरात दिवे पेटवून मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद

कोल्हापूर : कोरोना विरोधातील लढाईत कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने ९ मिनिटे वीज बंद ठेवून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले.मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकजुटीने मोदींच्या कोरोना विरोधातील लढाईच्या निर्धाराला कोल्हापुरातील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.रविवारी रात्री नऊ वाजताच कोल्हापुरातील नागरिकांनी ठिकठिकाणी, घराघरात मेणबत्त्या, पणत्या, दिवे पेटवून नऊ मिनिटे परिसर प्रकाशमान केला.सोशल डिस्टन्सचे पालन करून नागरिकानी नागरिकांनी मोकळ्या मैदानात तसेच घरांच्या दारामध्ये, अंगणात, बाल्कनीमध्ये, टेरेसवर दिवे लावल्याने सर्व परिसर उजळून गेला होता.कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातील लोकांनी लोकांनी उत्स्फूर्तपणे दिवे लावले. अनेकांनी मशाली पेटवल्या, तर काही ठिकाणी मोबाईलच्या टॉर्चचा प्रकाश पाडून मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

काही ठिकाणी मेणबत्त्या लावल्या, तर काहींनी टॉर्चच्या प्रकाशात मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. मात्र काही उत्साही मंडळींनी रस्त्यावर येऊन जल्लोष केला. ग्रामीण भागात तसेच शहर परिसरात मोकळ्या मैदानावर भारत मातेच्या प्रतिमेच्या भोवती तसेच भारतमातेच्या रांगोळी भोवती दिवे लावून परिसर प्रकाशमान केला.शहरातील राजारामपुरी, प्रतिभानगर, उद्योमनगर, शाहूपुरी या परिसरातील पॉवर ग्रिडवर कोणताही परिणाम झाला नाही, असा अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.गंगावेश परिसरात पैलवानांनी मेणबत्त्या पेटवून मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला तर कागल तालुक्यातील बाणगे येथील रवींद्र पाटील मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भारत मातेच्या रांगोळी भोवती दिवे पेटवले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर