शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

गुंडांच्या तीन टोळ्यांवर ‘मोक्का’चे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:22 IST

कोल्हापूर : वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुंडांच्या तीन टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाईचे प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठवले आहेत, त्याशिवाय ३८ ...

कोल्हापूर : वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुंडांच्या तीन टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाईचे प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठवले आहेत, त्याशिवाय ३८ गुंडांना तडीपार, तर सात झोपडपट्टीदादांना वर्षासाठी स्थानबध्द करणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

अधीक्षक बलकवडे म्हणाले, आगामी काळात महानगरपालिकेसह विविध संस्थांच्या निवडणुका असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना म्हणून गुन्हेगारांच्या कारवायांवर वचक ठेवण्यात येणार आहे. गंभीर गुन्ह्यांची चौकशी पोलीस उपअधीक्षकांमार्फत करण्यात येत आहे. त्यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांच्या कुंडल्या तयार केल्या आहेत. गुंडांच्या टोळ्या मोडीत काढण्यासाठी शहरातील तीन टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव करून तो मंजुरीसाठी पाठवला आहे. २०१९-२० या वर्षामध्ये एकाही झोपडपट्टीदादावर कारवाई केलेली नाही. शिरोळ, दानोळी, जयसिंगपुरातील दारू, हातभट्टीवाले झोपडपट्टीदादा असलेल्या सात जणांना वर्षभरासाठी स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात दारू, जुगार, मटका जुगार याबाबत ३०० ठिकाणी छापे टाकले, तर ३२९ आरोपींवर कारवाई केली.

एस.टी. गॅंगवर ‘मोक्का’साठी प्रयत्न

चार दिवसांपूर्वी शाहू टोल नाक्यावर हॉटेल व्यावसायिकांवर झालेल्या हल्ला प्रकरणातील गेंड्यासह सर्व आरोपींचा गुन्हेगारीचा पूर्वेतिहास तपासून त्यांच्यावर मोक्का लावण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.

वीकेंड लॉकडाऊनमध्ये २९८२ जणांवर कारवाई

वीकेंड लॉकडाऊनच्या दोन दिवसात जिल्ह्यात विनामास्कबाबत ९४५ जणांकडून १,३७,९०० रुपये दंड वसूल केला. लॉकडाऊनचा भंग करणाऱ्या १९३७ वाहतूकदारांकडून २,६४,२०० रुपये दंड वसूल केला.

कोरोना प्रतिबंधक लस घेतली २२०० पोलिसांनी

जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकारी व दोन पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आले, तर सुमारे २२०० पोलिसांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला, तर दुसरा डोस हा १५ टक्के पोलिसांनी घेतला. दुसरा डोस ४५ नंतर घेतल्यानंतर परिणामकारक ठरत असल्याच्या माहितीमुळे पोलीस दुसरा डोस घेण्यास उशीर करत असल्याचेही अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.