शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीप्रकरणी ‘किशोर माकडवाला गँग’विरुद्ध ‘मोक्का’ कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:51 IST

कोल्हापूर : खंडणीप्रकरणी किशोर माने, त्याचा भाऊ किरण माने यांच्यासह सहाजणांच्या ‘किशोर माकडवाला गँग’विरुद्ध कोल्हापूर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत ...

कोल्हापूर : खंडणीप्रकरणी किशोर माने, त्याचा भाऊ किरण माने यांच्यासह सहाजणांच्या ‘किशोर माकडवाला गँग’विरुद्ध कोल्हापूर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली. गोकुळ शिरगाव पोलिसांनी या टोळीविरोधात दाखल प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंजुरी दिली. त्यानुसार या टोळीविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी बुधवारी दिली.

कारवाईतील संशयितांची नावे अशी : टोळीप्रमुख किशोर दडप्पा माने (रा. इंदिरानगर, शिवाजी पार्क), राकेश बाळू कांबळे (रा. महालक्ष्मीनगर, कदमवाडी), विशाल जयसिंग मछले (रा. आंबेडकरनगर, कसबा बावडा), इरफान सिकंदर शेख (रा. आंबेडकर हॉलमागे, राजेंद्रनगर), राहुलसिंग तुफानसिंग दुधाणे (रा. विचारेमाळ, सदर बाजार), किरण दडाप्पा माने (रा. साळोखे पार्क). यापैकी किरण माने हा अद्याप गायब असून इतरांवर अटकेची करवाई केली आहे. पोलीस तपासात ‘किशोर माकडवाला गँग’चा प्रमुख किशोर माने व त्याचे साथीदार २०११ पासून संघटित गुन्हेगारीमध्ये सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कामगार ठेकेदार जामिऊल अन्सरुल हक (वय ३९, रा. मूळ मुर्शिदाबाद, कोलकाता, सध्या रा. तामगाव, ता. करवीर) यांचे दि. २८ ऑगस्ट रोजी ‘किशोर माकडवाला गँग’च्या प्रमुखांनी चारचाकी गाडीतून अपहरण करून त्यांना दोन दिवस चंदगडसह गोकुळ शिरगाव (ता. करवीर) परिसरात फिरविले. ‘परराज्यांतून येऊन भरपूर पैसे कमवतोस, त्यामुळे तुला हप्ता द्यावा लागेल,’ असे सांगून त्यांना चाकूचा धाक दाखवून सोन्याची चेन, अंगठी, खिशातील पैसे असा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेऊन खंडणीची मागणी केली. त्यानंतर तक्रारीनुसार पोलिसांनी ‘किशोर माकडवाला गँग’च्या पाचजणांना दि. ४ ते ८ सप्टेंबरदरम्यान अटक केली. तसेच गुन्ह्यात वापरलेली स्काॅर्पिओ गाडी जप्त केली; तर किरण मानेचा पोलीस अद्याप शोध घेत आहेत. अटकेतील सर्व संशयित हे कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी केला. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या टोळीविरोधात मोक्कांतर्गत कारवाईचे आदेश दिले.

टोळीविरुद्ध गुन्हेगारीचा आलेख

‘किशोर माकडवाला गँग’ टोळीविरुद्ध शाहूपुरी, जुना राजवाडा, शाहूवाडी, राजारामपुरी ठाणे, आदी कार्यक्षेत्रांत २० हून अधिक गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये खून, जबरी चोरीचा प्रयत्न, दरोडा, पोक्सोसह विनयभंग, गंभीर दुखापत, दरोड्याचा प्रयत्न, दंडाधिकारी आदेशाची अवमानना, मालमत्ता कायदा यांचा प्रत्येकी १ गुन्हा; गर्दी, मारामारी, अपहरणासह खंडणीचे प्रत्येकी दोन गुन्हे, दुखापतीसह जबरी चोरी पाच, जबरी चोरी तीन असे एकूण २० गुन्हे दाखल आहेत. त्यांपैकी १८ गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत.

फोटो ०२१२२०२०-कोल-किशोर माने (मोक्का आरोपी), राकेश कांबळे, विशाल मछले, इरफान शेख, राहुलसिंग दुधाणे (मोक्का आरोपी).

(तानाजी)