मंत्री मुश्रीफ म्हणाले, अध्यक्ष निवडीची जबाबदारी माझ्याकडे; अजूनही बघा; मी तुमच्यासोबत, सतेज पाटलांनी टाकली पुन्हा गुगली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:15 IST2026-03-16T13:13:28+5:302026-03-16T13:15:23+5:30

गोकुळच्या कार्यक्रमात टोलेबाजी : ‘भैय्या’ना काँग्रेस शिवाय पर्याय नाही : सतेज पाटील

Minister Mushrif said I am responsible for the election of the zp president, still look; I am with you, Satej Patil threw a googly again | मंत्री मुश्रीफ म्हणाले, अध्यक्ष निवडीची जबाबदारी माझ्याकडे; अजूनही बघा; मी तुमच्यासोबत, सतेज पाटलांनी टाकली पुन्हा गुगली

मंत्री मुश्रीफ म्हणाले, अध्यक्ष निवडीची जबाबदारी माझ्याकडे; अजूनही बघा; मी तुमच्यासोबत, सतेज पाटलांनी टाकली पुन्हा गुगली

कोल्हापूर : उद्या, मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी होत असून त्यासाठी सतेज पाटील यांच्यावर विरोधी पक्षनेता तर माझ्यावर अध्यक्ष निवडीची जबाबदारी असल्याचा खोचक टोला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. गेल्या पाच वर्षात पारदर्शी कारभारासाठी मीच संचालकांशी भांडत आलो, त्यामुळे संचालक माझ्यावर नाराज झाले आहेत. मात्र सतेज पाटील मात्र सोने घ्या सोन्यासारखे राहा,’ या भूमिकेत राहिल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

गोकुळ’च्या ६३ व्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्यासह सर्वच नेत्यांनी जोरदार फटकेबाजी करत आगामी निवडणुकीची दिशा स्पष्ट केली. संघात चांगली कामे कोणती झाली हे सांगत असताना सतेज पाटील यांनी थोडे राजकारण केल्याचा चिमटा मंत्री मुश्रीफ यांनी काढला. यावर, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांचा उल्लेख करत सतेज पाटील म्हणाले, ‘भैय्या महायुतीच्या भांडणात तुम्हाला लॉटरी लागणार नाही. आमच्याशिवाय (काँग्रेस) तुम्हाला पर्याय नाही.

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी उद्या होणार; सत्तेचा फार्म्युला कसा...जाणून घ्या

अजूनही बघा; मी तुमच्यासोबत आहे

कार्यक्रमाच्या अगाेदर संघाच्या आवारातील श्रीकृष्ण मंदिरात जाऊन आल्याचे सांगत पाच वर्षात चोख कारभार केला. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता काम करत गेलो. राजेश पाटील तुम्ही आणि मी एकत्र कर्म करत राहणार असल्याचे सूतोवाच आमदार पाटील यांनी केले. यावर, ‘आमच्यात भांडणे लावू नका’, अशी कोपरखळी मंत्री मुश्रीफ यांनी लगावली. ‘अजूनही बघा, तुमच्या बाजूला असलेल्यांनी ऐकले नाही तर मी जिल्हा परिषदेत तुमच्यासोबत आहेच, असे सूचक वक्तव्य पाटील यांनी केले.

मुलग्याच्या लग्नात ‘गोकुळ’चे पदार्थ

नेतृत्व करणाऱ्यांनी स्वत:पासून ‘गोकुळ’चे पदार्थ वापरायला हवे. माझ्या मुलग्याच्या लग्नात ‘गोकुळ’ची बासुंदी सांगितली आहे. त्यासाठी १२ लाखांचा चेक दिला बरं का? नाहीतर बाळासाहेब खाडे म्हणायचे पैसेच मिळाले नाहीत, असा टोला सतेज पाटील यांनी लगावला.

‘गोकुळ’च्या निवडणुकीला गालबोट!

‘गोकुळ’च्या निवडणुकीला गालबोट लागल्याचे सांगत अरुण डोंगळे म्हणाले, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे पाठबळ सोबत असेल तर आम्हाला कोणाची भीती नाही.

Web Title : परिषद प्रमुख चुनाव पर मुश्रीफ; सतेज पाटिल की फिर गुगली!

Web Summary : मंत्री मुश्रीफ ने परिषद चुनाव की जिम्मेदारी हास्यपूर्ण ढंग से पाटिल और खुद को सौंपी। पाटिल ने परिषद में निरंतर समर्थन का संकेत दिया। उन्होंने गोकुल उत्पादों के उपयोग पर जोर दिया, यहां तक कि अपने बेटे की शादी में भी, जबकि डोंगले ने गोकुल के चुनाव के लिए आत्मविश्वास जताया।

Web Title : Mushrif on council head pick; Satej Patil's googly again!

Web Summary : Minister Mushrif humorously assigned council election responsibility to Patil and himself. Patil hinted at continued support in the council. He emphasized using Gokul products, even at his son's wedding, while Dongle asserted confidence for Gokul's election.