शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

Kolhapur Politics: हसन मुश्रीफांनी टाकला सहावा ‘गिअर’, ‘गोकुळ’च्या ठराव संकलनाला जोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 16:39 IST

सहा तालुक्यांत नेत्यांना बळ देत जोरदार जोडण्या; शिंदेसेना, भाजप अजून शांत

समीर देशपांडेकोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये ठरलेला डाव उधळल्यानंतर महायुतीचा अध्यक्ष म्हणून नविद मुश्रीफ पदावर बसताच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सहावा ‘गिअर’ टाकला असून, पहिल्या टप्प्यात सहा तालुक्यांत नेते, शिलेदार कामाला लावले आहेत. अधिकाधिक ठराव संकलित करण्यासाठी जोरदार यंत्रणा त्यांनी उभी केली असून, तुलनेत शिंदेसेना आणि भाजपच्या गोटात शांतता दिसून येत आहे.दोन महिन्यांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदावरून उठलेले राजकीय वादळ मुश्रीफ यांच्या पारड्यात अध्यक्षपद देऊनच शांत झाले. आमदार सतेज पाटील यांच्या पाठबळावर ‘सहकारात भाऊ भाऊ आणि इतर निवडणुकांत वेगळे राहू’ हा नाटकाचा प्रयोग पुढेच चालवण्याचे धोरण मुश्रीफ यांचे होते, परंतु भाजप, शिंदेसेनेने त्यांचा हा मनसुबा उधळून लावत त्यांच्या चिरंजीवांना अध्यक्ष करून ‘गाेकुळ’च्या येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जबाबदारी वाढवून ठेवली.यापुढची निवडणूक महायुती म्हणूनच लढवायची हे निश्चित झाल्यानंतर मात्र मुश्रीफ यांनी आपला पवित्रा बदलला आहे. जर महायुतीच्या आघाडीचे नेतृत्वच करायचे आहे आणि तिथे जर आपली प्रतिष्ठा पणाला लागणारच आहे, तर मग संस्थेत आपली माणसे अधिक हवीत आणि त्यासाठी ठरावांची ताकदच निर्णायक ठरू शकते याची जाणीव असणाऱ्या या नेत्याने जोडण्या घालायला सुरुवात केली आहे.मुश्रीफ यांच्या वेगवान जोडण्यांच्या तुलनेत शिंदेसेना आणि भाजपच्या गोटात तूर्त शांतताच आहे. गेल्या ‘गोकुळ’च्या निवडणुकीत विरोधी आघाडीतून निवडून आलेल्यांपैकी केवळ शौमिका महाडिक याच शेवटपर्यंत तिथे विरोधक म्हणून सक्रिय राहिल्या. उरलेले सत्तारूढ आघाडीत कधी मिसळून गेले हे कोणालाच कळले नाही. या पार्श्वभूमीवर आता बदलत्या राजकीय परिस्थितीत शिंदेसेना आणि भाजपची रणनीती लवकरच स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.

‘होमपीच’वर सक्रियचंदगड, आजरा, गडहिंग्लज, कागल, भुदरगड आणि राधानगरी हे सहा तालुके म्हणजे मुश्रीफ यांचे ‘होमपीच’ असल्याने त्यांनी याच ठिकाणी आपले शिलकीतले डाव टाकायला आतापासूनच सुरुवात केली. परिणामी या सहाही तालुक्यांत ए. वाय. पाटील यांच्यापासून ते माजी आमदार राजेश पाटील यांच्यापर्यंत, के. पी. पाटील यांच्यापासून ते सतीश पाटील यांच्यापर्यंत सर्वांना त्यांनी या कामात गुंतवले असून, अधिकाधिक ठराव ताब्यात ठेवूनच चर्चेचा बसायचा त्यांचा इरादा स्पष्ट झाला आहे.

भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थशिंदेसेनेचे नेते पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे त्यांच्या त्यांच्या भागात ठराव गोळा करण्यासाठी खंबीर आहेत. आमदार अमल महाडिक दक्षिण कोल्हापूरमध्ये सक्रिय होतील, परंतु उर्वरित तालुक्यात भाजपकडून ठराव गोळा करण्यासाठी आदेश आणि बळ देण्याची चर्चासुद्धा सुरू नसल्याने भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.