शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री येता दारी, डांबर पडे रस्त्यावरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:24 IST

कोल्हापूर : मंत्री येता दारी, डांबर पडे रस्त्यावरी असा अनुभव सध्या जिल्हा परिषद परिसरातील नागरिकांना ...

कोल्हापूर : मंत्री येता दारी, डांबर पडे रस्त्यावरी असा अनुभव सध्या जिल्हा परिषद परिसरातील नागरिकांना येत आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी खोदलेला रस्ता डांबरी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक मंत्री या रस्त्यावरून जाणार असल्याने कोल्हापूर महापालिकेने ही गडबड सुरू केली आहे.

पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री जयंत पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, सतेज पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह अनेक मान्यवर याच रस्त्यावरून जिल्हा परिषदेत येणार आहेत. या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे त्यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.

गेल्या पंधरवड्यामध्ये जिल्हा परिषदेसमोरून केबल टाकण्यासाठी मोठी खुदाई करण्यात आली होती. चर बुजविल्यानंतर गेले आठ-दहा दिवस येथे धुळीचे साम्राज्य होते. मात्र, सोमवारी हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेत आल्यानंतर शहर अभियंता नेत्रदीप सरनाेबत यांना फोन लावून रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार मंगळवारी दुपारपासून या ठिकाणी काम सुरू झाले आहे. चर भरून त्यावर मोठी खडी टाकण्यात आली. खड्डे पडलेल्या रस्त्यावर डांबर ओतण्यात आले आहे. जादा यंत्रणा लावून सायंकाळी उशिरापर्यंत या ठिकाणी काम सुरू होते.

चौकट

रस्ता करा, पण.....

मंत्री येणार म्हणून रस्त्यावर डांबर ओतण्यापेक्षा नेहमीचे काम म्हणून महापालिका ही कामे तातडीने का करत नाही, असा सवाल यानिमित्ताने येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. जर मंत्री आले नसते, तर आम्हाला महिनाभर धुरळा खावा लागला असता. त्यामुळे मंत्री येण्याला आणि डांबर पडण्याला आमचा विरोध नाही; पण नागरिकांना काय त्रास होतो याचा विचार करून महापालिकेने कामकाज करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

१९०१२०२१ कोल झेडपी ०१/०२/०३

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मंत्री शुक्रवारी जिल्हा परिषदेत येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हा परिषदेसमोरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.

छाया - समीर देशपांडे