शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: 'डिबेंचर'प्रश्नी दूध उत्पादकांचा 'गोकुळ'वर मोर्चा; कार्यालयात जनावरे घुसवली, आंदोलक-पोलिसांमध्ये झटापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 13:51 IST

आंदोलकांनी गोकुळच्या कार्यालयात जनावरे घुसवण्याचा प्रयत्न केला

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाला गालबोट लागले. आंदोलकांनी जनावरे संघाच्या मुख्य प्रवेशव्दारातून आत घुसवण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी रोखले. त्यानंतर पोलिस व आंदोलकांमध्ये अक्षरश: राडा झाला. आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला. अखेर दार ढकलून आंदोलनकर्ते आत घुसल्यानंतर एकच गोंधळ उडाला.संघाने दिवाळी दूध दरफरकातून डिबेंचर कपात केल्याने दूध संस्था प्रतिनिधींमध्ये असंतोष आहे. कपात केलेली रक्कम परत करा, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. शासकीय विश्रामगृह आवारातून म्हैशी व गायी घेऊन संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयाच्या दारात मोर्चा आल्यानंतर आंदोलकांनी प्रवेशव्दाराच्या दारांना म्हैस बांधली. त्यांना रोखल्यानंतर गोंधळ उडाला. याच दरम्यान, पोलिस व आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट उडाली. एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने पोलिसांनी लाठीहल्ला केला. बराचवेळ झटापट सुरू राहिल्यानंतर दार ढकलून आंदोलनकर्ते जनावरांसह आत घुसल्यानंतर एकच गोंधळ उडाला. शाैमिका महाडिक यांनी आंदोलनकर्त्यांना शांत केल्यानंतर संचालकांसोबत चर्चेसाठी त्यांच्यासह शिष्टमंडळ आत गेले. यावेळी ‘गोकुळ’चे माजी संचालक विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, ‘राजाराम’ कारखान्याचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, संचालक तानाजी पाटील, ‘भोगावती’चे माजी उपाध्यक्ष हंबीरराव पाटील आदी सहभागी झाले होते.दरम्यान, डिबेंचरची तरतूद झालेली आहे. तरीही दूध उत्पादकांना काहीतरी देण्याची मानसिकता संचालक मंडळाची असून, उत्पादकांना कसे देता येईल, याबाबत आज, शुक्रवारी जाहीर करण्याचे आश्वासन ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्ते तेथून निघून गेले.‘जय श्रीराम, जय शिवाजी जय भवानी’च्या घोषणाआंदोलनकर्ते आत आल्यानंतर ‘जय श्रीराम’, ‘जय शिवाजी जय भवानी’ यासह ‘वाचवा रे वाचवा गोकुळ वाचवा’, ‘डिबेंचर आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे’, महादेवराव महाडिक व शौमिका महाडिक यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

नासधूस करणारे आम्ही नव्हे ते होते‘गोकुळ’वर प्रेम करणारे आम्ही दूध उत्पादक आहोत. नासधूस करणारे आम्ही नाही. मागील पंचवार्षिकमध्ये कोणी कुंड्या फोडल्या? अशी विचारणा प्रताप पाटील-कावणेकर यांनी केली.

..तर भावाचा कान पिळूहोय, अध्यक्ष (नविद मुश्रीफ) माझा लाडका भाऊ आहे, मी त्यांची मोठी बहीण आहे. जिथे ते चांगले काम करतील तिथे शाब्बासकी देऊ. पण, चुकीच्या कारभारावेळी कान पिळण्यास मागेपुढे बघणार नाही, असा दमच शौमिका महाडिक यांनी भरला.महायुतीत मी मिठाचा खडा टाकलेला नाहीहा मोर्चा मी स्वत: काढलेला नाही, मी ‘गोकुळ’च्या विरोधात बोललेले नाही. दूध उत्पादक माझ्याकडे निवेदन घेऊन आले, मी त्यांच्यासोबत यावे, अशी त्यांची इच्छा होती. मी महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा मिठाचा खडा टाकलेला नाही. आज मी येथे विश्वस्त म्हणून बसले ते दूध संस्था प्रतिनिधींनी मतदान केल्यामुळे. त्यांचे प्रश्न सोडवू शकले नाहीतर मला विश्वस्त म्हणून घेण्याचा अधिकार नसल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Milk producers protest Gokul over 'Debenture' issue; clashes erupt.

Web Summary : Milk producers protested at Gokul's office in Kolhapur over debenture deductions, leading to clashes with police. Shoumika Mahadik led the protest, demanding answers from Gokul's chairman and a solution before Diwali.