शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी सुनावणीला व्यापाऱ्यांची दांडी

By admin | Updated: November 13, 2014 23:50 IST

कारवाईच्या हालचाली : ३८ पैकी पाचजण हजर; व्यापारी शासनभरोसे

सांगली : महापालिकेच्या एलबीटी वसुलीबाबत व्यापाऱ्यांची आज सुनावणी झाली. या सुनावणीला ३८ व्यापाऱ्यांपैकी केवळ पाचजणच हजर राहिले होते. राज्यातील भाजप सरकारने एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिल्याने व्यापाऱ्यांनी सुनावणीला दांडी मारल्याची चर्चा आहे. या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. गेल्या दीड वर्षापासून महापालिका व व्यापाऱ्यांत एलबीटीवरून संघर्ष सुरू आहे. त्यात नव्याने सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने एलबीटी रद्द करण्याबाबत आश्वासन दिले आहे. नुकतेच राज्यपालांच्या अभिभाषणातही त्याचा उल्लेख झाला आहे. एलबीटी रद्द होऊन पर्यायी कर येणार असल्याने व्यापाऱ्यांनीही महापालिकेकडे पाठ फिरविली आहे. ऐन दिवाळीतही केवळ साडेचार कोटींपर्यंतची एलबीटी वसूल झाली होती. त्यात महापालिकेने दीडशे व्यापाऱ्यांच्या दुकानांवर छापे टाकण्याची परवानगी शासनाकडे मागितली आहे. तसेच २१ व्यापाऱ्यांवर फौजदारीचा निर्णयही प्रलंबित आहे.आज एलबीटी कर न भरणाऱ्या ३८ व्यापाऱ्यांना सुनावणीसाठी बोलाविण्यात आले होते. उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, एलबीटी अधीक्षक एस. जी. मुजावर यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. त्यावेळी केवळ पाच व्यापारी हजर होते. उर्वरित व्यापाऱ्यांनी दांडी मारली. उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यानंतर सुनावणीला गैरहजर राहणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले.एका व्यापाऱ्याला नोटीसमिरज एमआयडीसीतील मधुकर इंडस्ट्रिजचे चंद्रसेन मधुकर बुधगावकर यांनी महापालिकेला एलबीटीपोटी ५० हजार रुपयांचा धनादेश दिला होता. हा धनादेश न वठताच परत आला आहे. त्याबद्दल बुधगावकर यांना महापालिकेच्यावतीने नोटीस बजाविण्यात आली असून, धनादेशाची रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.