शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांच्या दुकाने बंदला कोल्हापूर शहरात प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 14:09 IST

corona virus Kolhapur : अनलॉकमध्ये सर्वच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, या मागणीसाठी बुधवारी शहर आणि उपनगरातील व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन हटवा, व्यापाऱ्यांना वाचावा अशा आशयाचे फलक हातात घेवून लक्ष वेधले. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या पुढाकाराने आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देदुकानासमोर फलक घेवून वेधले लक्षसर्वच दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी

कोल्हापूर : अनलॉकमध्ये सर्वच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, या मागणीसाठी बुधवारी शहर आणि उपनगरातील व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन हटवा, व्यापाऱ्यांना वाचावा अशा आशयाचे फलक हातात घेवून लक्ष वेधले. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या पुढाकाराने आंदोलन करण्यात आले.कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत काल शहरातील सर्वच अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवेसह सर्वच व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत व्यवसाय बंद ठेवून व्यापाऱ्यांनी जागेवरच विनाघोषणा हातात फलक घेऊन आंदोलन केले.कोरोनामुळे दोन महिने अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवसाय निर्बंधांनुसार बंद राहिले. त्यामुळे व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले. सर्व व्यवसाय सुरू करण्याचे शासनाने अद्यादेश काढावेत, अशी मागणी व्यापाऱ्यांची होती. यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता, पण ४ जूनच्या अध्यादेशानुसार पुन्हा जीवनावश्यक वस्तूव्यतिरिक्त इतर व्यवसाय बंद राहणार हे स्पष्ट झाल्याने अस्तित्वासाठी व्यापारी रस्त्यावर उतरत असल्याचे अध्यक्ष शेटे यांनी सांगितले.या आंदोलनात स्टोन ट्रेडर्स असोसिएशन, प्लायवूड डिलर्स असोसिएशन, जिल्हा फूटवेअर्स असोसिएशन, वाईन मर्चंट्स असोसिएशन, हॉटेल मालक संघ, जिल्हा बार असोसिएशन, सराफ व्यापारी संघ, जिल्हा सराफ संघ, कापड व्यापारी संघ, रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन, कॉम्प्युटर असोसिएशन, आयटी असोसिएशन, पानपट्टी असोसिएशन, स्पेअर पार्टस् अँड ऑटोमोबाईल्स डिलर्स असोसिएशन, रेडिमेड गारमेंट्स असोसिएशन, इलेक्ट्रिक असोसिएशन, भांडी व्यापारी असोसिएशन, टू व्हिलर स्पेअर पार्टस् असोसिएशन तसेच औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

आंदोलनातून अत्यावश्यक सेवेतील औषध दुकाने, किरणा दुकाने, भाजीपाला विक्री याना वगळण्यात आले होते.आंदोलनात राजारामपुरी व्यापारी असोसिएशननेही भाग घेतला तसेच या व्यवहार बंदला कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशननेदेखील पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर