शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या बदली प्रकरणांतील मास्टरमाइंड मोकाटच, एसटी संघटना कारवाईसाठी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 11:47 IST

अधिकारी-कर्मचारी न्याय वेगळा 

सचिन यादव

कोल्हापूर : राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक-वाहकांनी हिशेबात एक रुपयाचा घोळ केल्यास त्याला तत्काळ निलंबित केले जाते. रात्री बारा वाजेपर्यंत अधिकारी थांबून त्यांच्या निलंबनाचा आदेश काढतात. मात्र, विभाग नियंत्रक सुटीवर असताना ४३ लिपिक-टंकलेखकांचे बदली आदेश परस्पर काढल्याप्रकरणी कार्यभार काढून घेतल्याची फुटकळ कारवाई केली आहे. बदली प्रकरणातील मास्टरमाइंडवर कारवाईची मागणी एसटी संघटनांकडून होत आहे.

कोल्हापूर विभागातील एसटीतील लिपिक-टंकलेखकांच्या गेल्यावर्षी तयार केलेले आदेश यावर्षी परस्पर काढण्यात आले. या आदेशावर एका अधिकाऱ्याची सही आहे. त्यांनी ते आदेश बारा आगारांना चुकून काढल्याचे सांगितले आहे. गेल्या दहा वर्षांत हिशेबात दोन, पाच रुपये आणि दहा रुपये कमी असल्याचे कारण दाखवीत काही चालक आणि वाहकांवर ठपका ठेवून त्यांना निलंबित केले आहे. मग आता या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न कर्मचारी विचारत आहेत.

निलंबनाचे आदेश तयार; पण..

मुंबईत परिवहनमंत्र्यांकडे एसटीच्या काही संघटनांनी संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली. त्यांच्या निलंबनाचे आदेश तयार करण्यास सांगितले. मात्र, प्रत्यक्षात तसे काही आदेश निघालेच नाहीत. तिथे काय चावी फिरली अशी विचारणा होत आहे.

दोन महिलांची समिती

प्रादेशिक व्यवस्थापक, सनियंत्रण समितीने कोल्हापूरच्या बदली प्रकरणी दोन महिलांची समिती स्थापन केली आहे. त्यात सातारा विभागातील विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी शुभांगी धुमाळ आणि पुणे विभागातील आस्थापना पर्यवेक्षक जयाप्रदा फड यांची नियुक्ती केली आहे. त्यासह मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी सोमनाथ तिकोटकर यांची चौकशी समिती स्वतंत्र तपास करणार आहे.

चौकशीसाठी समकक्ष अधिकारी

विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी पदाचा कार्यभार गीतांजली सूर्यवंशी यांच्याकडून काढून घेतला. त्यांचे मूळ पद आस्थापना पर्यवेक्षक आहे. त्यांची चौकशी करण्यासाठी पुणे विभागातून समकक्षच आस्थापना पर्यवेक्षकांची नियुक्ती केली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बदली प्रकरणी नेमलेली समिती केवळ फार्स आहे. बदली प्रकरणात अधिकारी दोषी असल्याचे स्पष्टपणे उघड होत आहे. त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी पुन्हा परिवहनमंत्र्यांकडे पाठपुरावा करू. - श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

English
हिंदी सारांश
Web Title : ST Transfer Scam Mastermind Still Free; Union Demands Action

Web Summary : Despite evidence of wrongdoing in unauthorized ST employee transfers, the key figure remains unpunished. Unions are aggressively pushing for suspension. An internal inquiry is ongoing, but unions criticize it as inadequate, demanding immediate action against the responsible officer.