विद्यार्थ्यांना मास्क, सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:24 IST2021-01-20T04:24:33+5:302021-01-20T04:24:33+5:30
पाचवी, आठवीचे वर्ग दि. २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांची अँटिजेन टेस्ट करणे बंधनकारक आहे. ...

विद्यार्थ्यांना मास्क, सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक
पाचवी, आठवीचे वर्ग दि. २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांची अँटिजेन टेस्ट करणे बंधनकारक आहे. मुले आणि मुलींची बैठक व्यवस्था स्वतंत्रपणे करण्यात यावी. वर्गांचे निर्जंतुकीकरण करावे, आदी स्वरूपातील सूचना शिक्षण विभागाने शाळांना केल्या आहेत. त्यादृष्टीने बहुतांश शाळांनी तयारी पूर्ण केली आहे. काही शाळांची तयारी वेगाने सुरू आहे. दरम्यान, कोरोनामुळे या इयत्तांचा अभ्यासक्रम शिक्षण विभागाने २० टक्क्यांनी कमी केला आहे. ऑनलाईन पद्धतीने आतापर्यंत त्यातील ५५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. उर्वरित अभ्यासक्रम आणि पुढील तीन ते चार महिन्यांतील सुट्ट्यांबाबतच्या मार्गदर्शनाची शिक्षकांना प्रतीक्षा लागली आहे.
चौकट
पालकांचे संमतीपत्र आवश्यक
पालकांनी शाळांना संमतीपत्र देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना वर्गामध्ये प्रवेश देण्यापूर्वी शाळांना त्यांची थर्मल गनने तपासणी करावी लागणार आहे. त्यांच्यासाठी सॅनिटायझर आणि हात धुण्याची व्यवस्था शाळांनी करावयाची आहे. एका बेंचवर एका विद्यार्थ्याची बैठक व्यवस्था करावी.
फोटो (१९०१२०२१-कोल-विद्यापीठ हायस्कूल ०१ व ०२) : कोल्हापुरात मंगळवारी विद्यापीठ हायस्कूलमध्ये कर्मचाऱ्यांकडून वर्गांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. (छाया : आदित्य वेल्हाळ)