शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

मसाई पठाराचे रूप पालटणार

By admin | Updated: November 27, 2015 00:13 IST

विकासकामे होणार : पर्यटन प्रकल्प आराखडा स्वीकारला

पन्हाळा : मसाई पठार विकास आणि पर्यटन प्रकल्पाचा आराखडा राज्य शासनाच्यावतीने जिल्हा नियोजन समितीमधील पर्यटन विकास समितीने स्वीकारल्याचे मसाई पठार कृषी व पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी सांगितले. पन्हाळ्याच्या पूर्वेला व पन्हाळ्यापासून दोन कि.मी. अंतरावर असलेले मसाई पठार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे ‘टेबल लँड’ आहे. वन विभागाने या मसाई पठारावर ‘रिझर्व्ह फॉरेस्ट’ म्हणून घोषित करण्याव्यतिरिक्त काहीही केलेले नाही, यावर मसाई पठार कृषी व पर्यावरण मंडळाने गेल्या २० वर्षांपासून पर्यटन विकास प्रकल्पाचा आराखडा तयार केला होता. राज्य शासनाने त्यास हिरवा कंदील दाखवून या मंडळाचा आराखडा स्वीकारल्याचे पत्र दिले आहे. पन्हाळा ते मसाई पठार रोप-वे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन विकास समिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली आहे. जरी मसाईदेवी कृषी व पर्यावरण मंडळाचा हा पर्यटन विकास आराखडा स्वीकारला असला तरी या पठारावर कोणतेही बांधकाम न करता वनविभाग प्रकल्प राबविणार आहे. मसाई पठार पर्यटन विकास प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षांत तळ्यांचे गाळ काढण्यासाठी दीड कोटी रुपये वनविभागाला मिळाले आहेत. मात्र, काढलेला गाळ तिथेच पसरल्याने कास पठारावर जशी फुले येतात. तशी फुले येणे मसाई पठारावर बंद झाल्याने या प्रकल्पाचे गांभीर्य किंवा जैवविविधतेचे गांभीर्य वनविभागाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेसाठी मसाई पठार कृषी व पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले, उपाध्यक्ष संजीवनचे अध्यक्ष पी. आर. भोसले, सचिव पन्हाळा पोलीस पाटील भीमराव काशीद, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)४यात प्रामुख्याने पठारावर असणारी लहान-मोठी तळी यांचा गाळ काढून सुशोभीकरण करणे, विविध झाडे लावून त्या ठिकाणी औषधी वनस्पती, नक्षत्र गार्डन तयार करणे, वन्यप्राणी, पक्षांना पोषक वातावरण निर्माण करणे, बोटिंग, कारंजे, बांबू हाऊस, पॅराग्लायडिंग केंद्र, साहसी खेळ, आदी बाबींचा विकास करणे. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यातून विशाळगडाकडे जाताना या पठारावरून गेले त्या मार्गावर दुतर्फा झाडे लावणे, विद्युत- निर्मितीसाठी विंडमिल व सोलर पॅनेलचा उपयोग करणे, आदी बाबींबर या पर्यटन विकास प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे. सुमारे १७ कोटी खर्चाचा हा पर्यटन विकास प्रकल्प पर्यटकांंना आकर्षित करणाऱ्या विविध गोष्टी आहेत.