शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

माहेरी आलेल्या विवाहितेची रंकाळ्यात आत्महत्या, कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 18:44 IST

माहेरी आलेल्या विवाहितेने रंकाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. पूजा सागर गवळी (वय २५, रा. सुळकुड, ता. कागल) असे तिचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

ठळक मुद्देमाहेरी आलेल्या विवाहितेची रंकाळ्यात आत्महत्याकारण अस्पष्ट

कोल्हापूर : माहेरी आलेल्या विवाहितेने रंकाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. पूजा सागर गवळी (वय २५, रा. सुळकुड, ता. कागल) असे तिचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.पोलिसांनी सांगितले, पूजा गवळी हिचे नववीपर्यंत शिक्षण झाले. आई, भाऊ यांच्यासोबत ती राहत होती. वडिलांचे छत्र हरविले आहे. घरची परिस्थिती गरिबीची आहे. सात वर्षांपूर्वी तिचे सुळकुड येथील सागर गवळी यांच्याशी लग्न झाले. त्यांना देवराज (६) आणि सुदर्शन (४) अशी दोन मुलगे आहेत.

चार दिवसांपूर्वी ती माहेरी सुभाषनगरला आईकडे मुलांसह राहण्यासाठी आली होती. तिचा पती सागर हा कागल औद्योगिक वसाहतीमध्ये एका कारखान्यात नोकरी करतो. मंगळवारी (दि. १७) ती मैत्रिणीकडे जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडली. सायंकाळी चार वाजता डी. मार्टच्या समोर रंकाळा तलावात तिने उडी घेतली. फिरायला आलेल्या लोकांच्या समोर हा प्रकार घडल्याने त्यांनी आरडाओरड केली. तिला वाचविण्यासाठी कोणीच पुढे न गेल्याने बुडून तिचा मृत्यू झाला.

अग्निशामक दलाच्या जवानांना वर्दी मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यातून मृतदेह बाहेर काढून ‘सीपीआर’च्या शवागृहात ठेवला. तिच्या पर्समधील कागदपत्रांवरून तिची ओळख पटली. पोलिसांनी नातेवाइकांशी संपर्क साधून बोलवून घेतले. आई व भावाने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. तिचा भाऊ अजय व्हनकटे याने पोलिसांत वर्दी दिली आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर