शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

घरफाळा घोटाळ्याच्या अहवालाची अनेकांना धडकी

By admin | Updated: May 5, 2015 01:03 IST

‘एचसीएल’ आज देणार अहवाल : संबंधितांवर कडक कारवाई करण्याची आयुक्तांची सूचना

कोल्हापूर : घरफाळा विभागातील घोटाळ्यांचे प्रकार पुढे आल्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर यांनी या विभागासह ‘एचसीएल’ या संगणक ठेकेदारकडून मागविलेला अहवाल आज, मंगळवारी मिळणार आहे. त्याचा अभ्यास करून संबंधितांवर कडक कारवाईची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. आयुक्तांनी घरफाळ्याची ‘फाईल’ पुन्हा खुली करण्याचा निर्णय घेतल्याने भानगडी बाहेर येण्याच्या धास्तीने अनेकजण उन्हाळ्यात गारठले आहेत. बागल चौकातील एका मिळकतधारकास परस्पर आठ लाख रुपयांची सूट देण्याचा प्रकार पुढे आला. त्यानंतर घरफाळा विभागातील ढपल्याची मालिकाच उघड झाली. गेली पाच वर्षे विभागाचे लेखापरीक्षण न झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. त्यातूनच कच्च्या पावतीच्या आधारे लाखो रुपयांचा कर परस्पर जमा करून लाखो रुपयांचा गंडा महापालिकेला घातल्याचा धक्कादायक प्रकारही पुढे आला. हा प्रकार उघड होऊन वर्ष उलटले तरी घरफाळा विभागातील वरिष्ठांनी संबंधितांस नोटीस बजावण्याखेरीज काहीच केले नाही. घरफाळ्यातील घोटाळा म्हणजे संगणकीय चूक असल्याचे सांगत, सर्व प्रकार ‘एचसीएल’वर ढकल्याचा प्रकार सुरू आहे. या सर्व प्रकाराची गंभीर दखल आयुक्तांनी घेतली आहे. कच्च्या पावतीद्वारे केलेल्या घोटाळ्याचा अहवाल मंगळवारी आयुक्तांना सादर केला जाणार आहे. त्याआधारे आयुक्त पी. शिवशंकर यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.