राजाराम बंधाऱ्यानजीक पुरुषाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:26 IST2021-04-09T04:26:42+5:302021-04-09T04:26:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्याजवळ शेतात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. वडणगे गावाचे पोलीस पाटील ...

Man's body near Rajaram dam | राजाराम बंधाऱ्यानजीक पुरुषाचा मृतदेह

राजाराम बंधाऱ्यानजीक पुरुषाचा मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्याजवळ शेतात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. वडणगे गावाचे पोलीस पाटील उमेश नांगरे यांनी याबाबत करवीर पोलिसांना ही माहिती दिली. हवालदार मुन्ना सनदी आणि प्रशांत माने यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. गणपत जाधव यांच्या शेताजवळ हा मृतदेह आढळला. याबाबत संबंधिताबाबत माहिती असल्यास करवीर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी केले आहे.

तमनाकवाडी येथील वृद्धाचा मृत्यू

कोल्हापूर : कागल तालुक्यातील तमनाकवाडी येथील ज्ञानदेव रामू साबळे (वय ६२) यांनी लोहारमाळ येथे विषारी द्रव्य प्राशन केले होते, त्यांना अत्यावस्थेत निपाणी येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला.

भाजलेल्या वृद्धेचा मृत्यू

कोल्हापूर : कागल तालुक्यातील गोरंबे येथील भाजून गंभीर जखमी झालेल्या वृद्धेचा मृत्यू झाला. आक्काबाई हिंदूराव गुरव (वय ६५), असे त्यांचे नाव आहे. सोमवारी पहाटे त्या भाजून जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला.

Web Title: Man's body near Rajaram dam