मणिकर्णिकाचे काम ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST2021-04-23T04:25:10+5:302021-04-23T04:25:10+5:30

अंबाबाई मंदिर आवारातील मणिकर्णिका कुंडाचे गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले खुदाईचे काम अंतिम टप्प्यात आले. सध्या केवळ पश्चिमेकडील माऊली लॉजला ...

Manikarnika's work is stalled | मणिकर्णिकाचे काम ठप्पच

मणिकर्णिकाचे काम ठप्पच

अंबाबाई मंदिर आवारातील मणिकर्णिका कुंडाचे गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले खुदाईचे काम अंतिम टप्प्यात आले. सध्या केवळ पश्चिमेकडील माऊली लॉजला लागून असलेल्या भागाची खुदाई राहिली आहे. कुंडावरील अतिक्रमण उतरविण्यासाठी वारंवार माऊली लॉजच्या मालकांना विनंती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मध्यस्तीने देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हे मान्य करून त्यांनी कार्यालयाचे काही बांधकाम उतरविण्यास सुरुवातदेखील केली. तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती बरखास्त झाली. या निर्णयानंतर लॉजच्या मालकांनीही बांधकाम उतरविणे थांबविले. अजूनही लॉजचे थोडे अतिक्रमण कुंडावर आहे. पाण्याची टाकी आहे. हे उतरवून घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी सचिव विजय पोवार, महापालिका अधिकारी व लाॅज मालकांची बैठक झाली, त्यावेळी त्यांनी उतरवून घेतो एवढेच आश्वासन दिले आहे, कधी ते काही सांगितले नाही.

सध्या जिल्हाधिकारी समितीचे प्रशासक असले तरी त्यांच्याकडे जिल्ह्याचे काम आहे, शिवाय सध्या कोरोनाशी लढायचे आहे, त्यामुळे या समन्वयाची जबाबदारी सचिवांवर आहे. ‌उर्वरित बांधकाम समिती उतरवू शकत नाही का, या प्रश्नावर सचिव विजय पोवार यांनी मालकांनी आम्हाला तसे सांगितल्यास पुढील कार्यवाही समितीकडून केली जाईल, असे सांगितले.

---

फाेटो नं २२०४२०२१-कोल-मणिकर्णिका०१,०२

ओळ : अंबाबाई मंदिर आवारातील मणिकर्णिका कुंडावरील अतिक्रमणातील बांधकाम अर्धवटच उतरविण्यात आले आहे. त्यामुळे कुंडाची खुदाई व संवर्धनाचे काम थांबले आहे.

--

Web Title: Manikarnika's work is stalled