शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मंडलिकांवर जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:24 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या पदाधिकारी बदलाचा चेंडू ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शिवसेनेच्याच कोर्टात ...

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या पदाधिकारी बदलाचा चेंडू ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शिवसेनेच्याच कोर्टात ढकलला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय मंडलिक यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, त्यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांना फोन लावायला सुरुवात केली आहे. याबाबत मंडलिक यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाची गेले चार महिने चर्चा सुरू आहे. आज, उद्या राजीनामे होणार म्हणत म्हणत जानेवारीपासून मे महिना उजाडला आहे. मात्र, मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे तीन पदाधिकारी असल्यामुळे त्यांनी आधी राजीनामे देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले होते.

बांधकाम सभापती हंबीरराव पाटील हे माजी आमदार सत्याजित पाटील सरूडकर यांचे समर्थक आहेत. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत सरूडकर यांनी पालकमंत्री पाटील व मुश्रीफ यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. मात्र, त्यांनी याआधी आपली भूमिका स्पष्ट करताना जेव्हा शिवसेना नेत्यांची बैठक होईल, त्यावेळी काय तो निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. शनिवारी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

समाजकल्याण समिती सभापती स्वाती सासने या माजी आमदार उल्हास पाटील यांच्या समर्थक आहेत. राजीनाम्याबाबत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अजून माझ्याशी कुणीही संपर्क साधलेला नाही. मात्र, निरोप आला तर सर्वजण एकत्र बसून निर्णय घेऊ.

चौकट

मंडलिक यांचा मिणचेकर यांना फोन

शिक्षण सभापती प्रवीण यादव हे माजी आमदार सुजित मिणचेकर यांचे समर्थक आहेत. यादव यांच्या राजीनाम्याबाबत मिणचेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, खासदार संजय मंडलिक यांनी राजीनामा देण्याबाबत फोन केला होता. आपण बैठक बोलवा. त्यावेळी बसून निर्णय घेऊ, असे मी त्यांना सांगितल्याचे डॉ. मिणचेकर यांनी सांगितले.

चौकट

आधी सभापती, मग इतरांचे राजीनामे

जिल्हा परिषदेत शिवसेनेचे तीन सभापती असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे एक सभापती पद आहे. सुरुवातीला या चौघांनी अध्यक्षांकडे राजीनामे द्यावे लागतात. त्यानंतर ते मंजूर झाल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे राजीनामे होतात. अध्यक्ष यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे राजीनामा देणे बंधनकारक आहे. यामुळे जोपर्यंत चार सभापतींचे राजीनामे मंजूर होत नाहीत, तोपर्यंत पदाधिकारी बदल मोहिमेला वेग येणार नाही हे निश्चित.

चौकट

मंडलिक, नरके, आबिटकरांच्या कार्यकर्त्यांना संधी

या पदाधिकारी बदलानंतर खासदार मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. शिवसेनेचे तीनही पदाधिकारी हे खासदार धैर्यशील माने यांच्या मतदारसंघातील असल्याने पदाधिकारी बदलापेक्षा कोरोना हटवणे महत्त्वाचे आहे, अशी भूमिका माने यांनी घेतली होती. असे असले तरी बदलासाठी मंडलिक,आबिटकर, नरके आग्रही राहणार आहेत हे निश्चित.