शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

आकाशकंदील, शुभेच्छापत्रे बनवा

By admin | Updated: October 16, 2014 00:49 IST

मुलांच्या सुप्त गुणांना वाव : ‘लोकमत’ बालविकास मंच व ‘सेव्हन वंडर्स द किड्स वेअर’तर्फे आयोजन

कोल्हापूर : बालचमूंसाठी दिवाळीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे ‘लोकमत’ बालविकास मंच आणि सेव्हन वंडर्स द किड्स वेअर यांच्या संयुक्त विद्यमाने आकाशकंदील आणि शुभेच्छापत्रे बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळा २० आॅक्टोबरला न्यू महाद्वार रोडवरील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये सायंकाळी चार ते सहा या वेळेत होईल. दिवाळी काही दिवसांवर आली आहे. ती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यासाठी बालचमू सज्ज झाले आहेत. त्यासाठी गेल्या दोन आठवड्यांपासून ते तयारी करीत आहेत. गड, किल्ले तयार करीत आहेत. मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी लोकमत बालविकास मंच, सेव्हन वंडर्स द किड्स वेअर यांच्यातर्फे आकाशकंदील आणि शुभेच्छापत्रे बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेत लोकमत बालविकास मंच सदस्यांसाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे. अन्य इच्छुकांकडून ३० रुपये प्रवेश शुल्क भरून घेतले जाणार आहे. आकाशकंदील आणि शुभेच्छापत्रे बनविण्यासाठी आवश्यक साहित्य मुलांनी स्वत: आणावयाचे आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी १९ आॅक्टोबरअखेर शहर ‘लोकमत’ कार्यालयात नावनोंदणी करणे आवश्यक आहे.कार्यशाळेत उत्कृष्ट आकाशकंदील आणि शुभेच्छापत्रे बनवणाऱ्यांना सेव्हन वंडर्स द किड्स वेअर यांच्याकडून गिफ्ट म्हणून शॉपिंग व्हौचर दिले जाणार आहे. मंगळवार पेठेतील बिनखांबी रोडवरील विठ्ठल प्लाझा येथील सेव्हन वंडर्स द किडस वेअर दुकानात सहभागी होणाऱ्या प्रत्येकास खरेदीवर दहा टक्के सवलत मिळणार आहे. आकाशकंदीलाचे धडे देण्यासाठी सांगलीतील रंगकिरण ग्रुपचे अमोल शिंदे, तर शुभेच्छापत्रे शिकविण्यासाठी इंद्रजा कुलकर्णी येणार आहेत. अधिक माहितीसाठी लक्ष्मीपुरीतील ‘लोकमत’ कार्यालयात प्रत्यक्ष भेटून किंवा नितीन यांच्या ७७९८३४४७४४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.हे साहित्य हवे...आकाश कंदील तयार करण्यासाठी सहभागी होणाऱ्यांनी मध्यम आकाराचे १०० यूज अ‍ॅँड थ्रो चहाचे कप, पिनांच्या बॉक्ससह स्टेपलर, फेव्हिबॉँड, गोल्डन तार एक, अब्लावर्क १०० टिकल्या, तर शुभेच्छापत्रासाठी कात्री, टू इन वन चिकट टेप, पट्टी, पेन्सिअल, रबर, फेवीकॉल, हॅँडमेड पेपर, आर्टपेपर, दोन वेगवेगळ्या रंगांचे टिंटेड पेपर, ओळखपत्र आकाराचा एक फोटो.