लोकमत न्यूज नेटवर्क
उचगाव : उचगाव (ता. करवीर) येथे मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगणाची गरज असून, त्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी युवा सेनेने आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. उचगावची लोकसंख्या ४० ते ५० हजार आहे. मात्र, गावात मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्यासाठी उचगावात क्रीडांगण होणे गरजेचे असून, क्रीडांगणासाठी गावातील सरकारी गायरान गट नं. २६४ ही जागा द्यावी, अशी मागणी युवा सेनेने केली आहे. यावेळी युवा सेना उपजिल्हाप्रमुख विनायक जाधव, स्वाती जाधव, सरपंच मालूताई काळे, उपसरपंच मधुकर चव्हाण, माजी सरपंच गणेश काळे, सागर पाटील, संतोष चौगुले, प्रफुल्ल चौगुले, सचिन नागटिळक, प्रकाश कोप्पा, दीपक रेडेकर, प्रदीप बागडी, सचिन देशमुख, सचिन गाताडे, संदीप पाटील, कीर्ती मसुटे, अविनाश मोळे, रवी काळे, गुरूदेव माने, दत्ता यादव, सचिन चौगुले, दीपक पाटील, अमर जाधव, गजानन भडगावे आदी उपस्थित होते.
फोटो २० उचगाव क्रीडांगण
ओळ:- उचगावात क्रीडांगणासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी युवा सेनेने आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे केली. यावेळी विनायक जाधव, उपसरपंच मधुकर चव्हाण आदी उपस्थित होते.