शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाइन’चे वारे जोरात

By admin | Updated: August 19, 2015 23:20 IST

रुग्णांच्या संख्येत वाढ : गेल्या १५ दिवसांत ‘सीपीआर’मध्ये आठजण दाखल

कोल्हापूर : ‘स्वाइन फ्लू’चा फैलाव होण्यासाठी सध्या पोषक वातावरण झाल्याने जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. बुधवारी तीनजणांचा स्वाइन चाचणीचा अहवाल ‘होकारार्थी’ आला. जानेवारीपासून १७४ ‘स्वाइन’चे संशयित रुग्ण छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल झाल्याची नोंद आहे. त्यापैकी १८ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. नागरिकांनी दक्षता घेण्याचे व प्राथमिक लक्षणे आढळताच डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यातील आठजणांच्या स्वाइन चाचणीचा अहवाल ‘होकारार्थी’ आला आहे, तर आठवडाभरात गगनबावडा येथील तुकाराम पडवळ, हातकणंगले येथील लक्ष्मी देवाप्पा पाटील, पिराचीवाडी येथील शिवाजी बाळू डावरे या तिघांचा बळी स्वाइन फ्लूने घेतला आहे. सध्या वातावरणही स्वाइनला पोषक असेच आहे. साधी सर्दी, खोकला, ताप आणि अंग दुखत असल्यास त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. या किरकोळ वाटणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास कदाचित जीवही जाऊ शकतो. त्यामुळे दक्षता म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांकडे अथवा छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या स्वाइन कक्षाशी संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे आवाहन स्वाइन कक्षातील अधिकाऱ्यांनी केले आहे. १८ जणांचा मृत्यू  जानेवारीपासून १७४ ‘स्वाइन’ रुग्णांवर उपचार १८ जणांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू